________________
गुरु-शिष्य
जर शिष्याजवळ अधिक भक्तिभाव असेल तर तो गुरूपेक्षाही पुढे नाही का जाऊ शकत ?
५३
दादाश्री : हो, पण कुणी एखादाच ! सगळे नाही पोहोचत. त्याला मग पुढे दुसरे गुरू करावे लागतील. एखादा असा हुशार असेल ना, तर त्याचे डोके असे चालेल आणि तो मार्ग पकडतो आणि चालून शेवटपर्यंत पोहोचतो. परंतु तो अपवादच असेल !
प्रश्नकर्ता : गुरूंच्या उपदेशामुळे शिष्य मुक्ती प्राप्त करतो आणि गुरू मात्र तिथल्या तिथेच राहतात, असे सुद्धा घडते का ?
दादाश्री : हो, असे सुद्धा घडते. गुरू तिथल्या तिथेच राहतात आणि शिष्य पुढे निघून जातो.
प्रश्नकर्ता : तर यात पुण्याचा उदय काम करते ?
"
दादाश्री : हो, पुण्याचाच उदय ! अरे गुरू शिकवतात तेव्हा कित्येक शिष्य तर म्हणतात की, 'असे काही नसते!' तेव्हा त्याला नक्की काय असावे' याचा विचार येतो की, 'हे असे असावे.' म्हणजे त्याला लगेचच ज्ञान उत्पन्न होते. ' असे नसते' असे जर त्याला वाटले नसते तर त्याला ज्ञान उत्पन्न झाले नसते.
प्रश्नकर्ता : म्हणजे ' असे नसते' असा विकल्प उभा करण्यासाठी त्याला निमित्त मिळाले ?
दादाश्री : हो, ते निमित्त मिळाले इतकेच! त्या कारणामुळे त्याच्या ज्ञानाचा उदय झाला की ' असे असते, असे नसते, म्हणून हे असेच आहे. ' अर्थात पुण्य तऱ्हेतऱ्हेचे परिवर्तन घडवून आणते. पुण्य काय करीत नाही ? त्यासाठी पुण्यानुबंधी पुण्य पाहिजे.
तेव्हा संपूर्ण शुद्धी होते
क्रमिक मार्गात कसा व्यवहार आहे ? तर गुरू स्वतः जितका त्याग करतात ना, तेवढा त्याग त्यांच्या शिष्यांना करायला सांगतात की ' एवढे करा, तुम्ही एवढा त्याग करा' म्हणजे तिथे तप-त्याग या सर्व कसौटीत