________________
५२
गुरु-शिष्य
क्रमानुसार, क्रमिक मार्ग आणि दुसरा हा अक्रम मार्ग आहे, हा लिफ्टचा मार्ग आहे. म्हणून यात दुसरे काहीच करायचे नाही. त्या कर्मानुसार क्रमिक मार्गाने जितके गुरू केले असतील, ते गुरू आम्हाला वर चढवतात, मग गुरू सुद्धा प्रगती करतात आणि हे (शिष्य) सुद्धा प्रगती करतात असे करत-करत शेवटपर्यंत पोहोचतात. पण सर्वात प्रथम दृष्टी बदलली की, त्यानंतरचे गुरू ते खरे गुरू आणि खरा शिष्य. दृष्टी बदलत नाही तोपर्यंत सगळे बालमंदिर! हो, गुरूंसाठी मोह नक्कीच होतो, परंतु आसक्ती नसावी. आसक्ती असेल तर ती फार चुकीची गोष्ट समजली जाते. आसक्ती तर तिथे चालणारच नाही !
प्रश्नकर्ता : गुरूंचा मोह असेल, तर तो मोह बाधा उत्पन्न करतो का ?
दादाश्री : मोह तर फक्त, 'माझे कल्याण करीत आहेत' एवढ्या पुरताच ! कोणी म्हणेल, गुरुंमध्ये अभिनिवेश ( आपल्या मतास खरे मानून धरुन ठेवणे) असेल तर ? त्यास हरकत नाही. ते तर चांगलेच आहे. गुरू जिथपर्यंत पोहोचले असतील तिथपर्यंत तर पोहोचवतील. आपण ज्यांची भक्ती करू, ते जिथपर्यंत स्वतः पोहोचले असतील तिथपर्यंत आम्हालाही पोहोचवतील.
प्रश्नकर्ता : म्हणजे जिथपर्यंत पोहोचले असतील, तिथपर्यंतच पोहोचवू शकतील?
दादाश्री : हो, आपली शास्त्रे इतकेच सांगतात की जिथपर्यंत पोहोचले असतील, तिथपर्यंत पोहोचवतील. त्यानंतर पुढे दुसरे गुरू भेटतील. आणि गुरू तर, स्वतः जितक्या पायऱ्या चढले असतील तेवढ्या पायऱ्या आपल्याला चढवतील. ते दहा पायऱ्या चढले असतील आणि आपण सात पायऱ्या चढलो असू तर आपल्याला दहा पायऱ्यांपर्यंत पोहोचवतात. अजून कितीतरी, करोडो पायऱ्या चढायच्या बाकी आहेत. या काही थोड्याथोडक्या पायऱ्या नाहीत !
गुरूपेक्षा शिष्य सवाई...
प्रश्नकर्ता : जरी गुरू स्वतः शेवटपर्यंत पोहोचले नसतील, पण