________________
गुरु-शिष्य
दादाश्री : ती गोष्ट निश्चयामध्ये सांगितली आहे, व्यवहारात नाही. व्यवहारात तर सर्वांशी देणेघेणे (संबध) असतेच आणि निश्चयामध्ये कोणी कोणाचे काहीही करू शकत नाही. एक तत्त्व दुसऱ्या तत्त्वास कोणतीही मदत करू शकत नाही पण ती निश्चयाची गोष्ट आहे, व्यवहारात तर सगळे काही होते. हे चुकीचे वाक्य समजावल्यामुळे या पब्लिकचे पुष्कळ नुकसान झाले आहे.
प्रश्नकर्ता : म्हणूनच ही गोष्ट समजून घेण्याची इच्छा आहे.
दादाश्री : कुठलेही तत्त्व कोणालाही मदत करू शकत नाही, नुकसान करू शकत नाही, कुठलीही तत्त्वे एकमेकात मिसळत नाहीत, असे सांगू इच्छितात. त्याच्या ऐवजी ही गोष्ट लोकांनी व्यवहारात खेचून आणली. नाही तर व्यवहारामध्ये तर पत्नीशिवाय चालले नसते, बायकोला पतीशिवाय चालले नसते. व्यवहार सगळा परावलंबी आहे. निश्चय परावलंबी नाही, निश्चय स्वावलंबी आहे. आता व्यवहारात त्या निश्चयाला आणले, तर काय अवस्था होईल?
'खोट्याचे' ज्ञान आवश्यक ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का? मला माझी गोष्ट खरी ठरवायची नाही. तुम्हाला योग्य वाटत असेल तरच ती गोष्ट स्वीकारा. मला कोणत्याही गोष्टीला खरी ठरवायची नाही. तुम्हाला योग्य वाटली तर स्वीकारा आणि नाही स्वीकारले तरी माझी हरकत नाही. मला तर कोणत्याही परिस्थितीत सत्य बोलले पाहिजे. नाही तर या लोकांनी असेच सर्व चालवून घेतले आहे.
प्रश्नकर्ता : पण हा तर त्यांचा दृष्टिकोन आहे ना?
दादाश्री : ते बरोबर आहे, पण हे सत्य जर मी उघड केले नाही तर लोक त्या सत्यास झाकून ठेवण्याच्याच मागे आहेत आणि हे सत्य कोणी हिमतीने बोलू शकत नाही. 'हे खोटे आहे' असे तुम्हाला वाटले की नाही वाटले?
प्रश्नकर्ता : हो दादा.