________________
व
गुरु-शिष्य
दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यात क्रोध-मान-माया-लोभ याचा एक सुद्धा परमाणू असता कामा नये, किंवा काही अंशी तरी कमी झालेले असतील तरी चालेल, चालवून घेऊ. परंतु हे परमाणू त्यांच्यात जर ठासून भरलेले असतील, मग तर ते आपल्यातही आहेत आणि त्यांच्यातही आहेत, तेव्हा आपल्याला काय मिळणार? अर्थात जे कषायांनी भरलेले असतील त्यांना गुरू करू नये. जे जराशी छेड काढताच फणा दाखवतात त्यांना गुरू करू शकत नाही. जे अकषायी असतील किंवा मग मंद कषायवाले असतील, तर तसे गुरू करता येतील. मंद कषाय म्हणजे दोष आवरू शकतील अशी दशा असणारे. स्वतःला क्रोध येण्याआधीच क्रोधाला आवरतात म्हणजेच स्वतःच्या कंट्रोलमध्ये असायला हवेत. असे गुरू चालतील. जेव्हा की ज्ञानी पुरुषांमध्ये क्रोधमान-माया-लोभ नसतात, असे परमाणू नसतातच. कारण ते स्वतः वेगळे राहतात या देहापासून, मनापासून, वाणीपासून सगळ्यांपासून ते वेगळे राहतात!
सद्गुरू कोणाला म्हणता येईल? प्रश्नकर्ता : आता सदगुरू कोणास म्हणावे?
दादाश्री : असे आहे ना, सद्गुरू कोणास म्हणावे ही खूप कठीण गोष्ट आहे. शास्त्रीय भाषेत सद्गुरू कोणास म्हटले जाते? तर सत् म्हणजे आत्मा, तो ज्याला प्राप्त झाला आहे असे गुरू ते सद्गुरू! ।
सद्गुरू, ते तर आत्मज्ञानीच म्हटले जातात, त्यांना आत्म्याचा अनुभव झालेला असतो. सर्व गुरूंना आत्मज्ञान झालेले नसते. म्हणून जे निरंतर सत्मध्येच राहतात, अविनाशी तत्त्वात राहतात, ते सद्गुरू! म्हणजे सद्गुरू हे तर ज्ञानी पुरुषच असतात.
प्रश्नकर्ता : श्रीमद् राजचंद्र यांनी सांगितलेलेच आहे की प्रत्यक्ष सद्गुरूशिवाय मोक्ष होतच नाही.
दादाश्री : हो, त्याशिवाय मोक्ष होतच नाही. सद्गुरू कसे असावेत? तर कषायरहित असावेत, त्यांच्यात कषाय नसतातच. आपण