________________
३६
गुरु-शिष्य
नाही आणि मुक्ती तर ज्ञानी पुरुषच देतात. म्हणून व्यवहारात गुरूची गरज आहे आणि निश्चयात ज्ञानी पुरुषाची गरज आहे. दोघांचीही गरज आहे.
गुरू काय करतात? तर स्वतः पुढचे शिकत जातात आणि पाठीमागच्याला शिकवत जातात. मी तर ज्ञानी पुरुष आहे, शिकणे-शिकवणे हा माझा धंदा नाही. तुम्हाला जर मोक्ष पाहिजे असेल तर मी सर्व उलगडा करून देतो, दृष्टी बदल करवून देतो. आम्ही तर, जे सुख आम्ही अनुभवले ते सुख त्याला प्राप्त करवून देतो आणि बाजूला होतो.
गुरू ज्ञान देतात आणि ज्ञानी पुरुष विज्ञान देतात. ज्ञान संसारात पुण्य बांधते, मार्ग दाखवते. विज्ञान मोक्षाला घेऊन जाते. गुरू तर एक प्रकारचे शिक्षक म्हटले जातात. स्वतः काही नियम घेतलेले असतील आणि त्यांची वाणी चांगली असेल तर समोरच्यालाही नियमात आणतात. दुसरे काही करीत नाहीत, परंतु त्यामुळे संसारात तो मनुष्य सुखी होतो कारण तो नियमात आला म्हणून. आणि ज्ञानी पुरुष तर मोक्षाला घेऊन जातात. कारण त्यांच्याकडे मोक्षाचे लायसन्स आहे.
सांसारिक गुरू असतील त्यास काही हरकत नाही. सांसारिक गुरू तर करायलाच हवेत की ज्यांना आम्ही फॉलो (अनुसरण) करतो. परंतु ज्ञानींना गुरू म्हटले जात नाही, ज्ञानींना तर परमात्मा म्हटले जातात. देहधारी रूपात परमात्मा!! कारण ते देहाचे मालक नसतात, मनाचे मालक नसतात, वाणीचे मालक नसतात.
__गुरूंना तर ज्ञानी पुरुषांकडे जावे लागते, कारण गुरूंच्या अंतरंगात क्रोध-मान-माया-लोभ आदींची निर्बळता असते. अहंकार आणि ममता असते. आपण काही वस्तू वगैरे दिली तर ते हळूच त्या वस्तूस आत ठेऊन घेतात. जिथे बघाल तिथे अहंकार आणि ममता! पण लोकांना गुरूंची सुद्धा गरज भासतेच ना!
अनासक्त गुरू कामाचे __ प्रश्नकर्ता : अर्थात आसक्ती नसलेले गुरू हवेत, असाच अर्थ झाला ना?