________________
गुरु-शिष्य
देतात. जे महान गुरू आहेत, ज्ञानी पुरुष, ते प्रायव्हेटली देतात की तुम्ही अशा त-हेने शिष्यांबरोबर काम घ्याल तर तुम्ही बुडणार नाही आणि दुसरे सुद्धा बुडणार नाहीत.
प्रश्नकर्ता : गुरू होण्यासाठी गुरूकिल्ली हवी, तर ती किल्ली म्हणजे नेमके काय?
दादाश्री : ज्ञानी पुरुष त्याला अशी समज देतात की, 'तू असा आहेस आणि हे सगळे असे आहे. तू येथे गुरू होऊन बसला नाहीस. नाव असलेला-नामधारी गुरू होऊन बसला आहेस. तू निनावी आहेस. तू लघुत्तम राहून गुरूता कर, तर तू तरशील आणि दुसऱ्यांनाही तारशील.' हे तर त्यांच्याजवळ गुरूकिल्ली नाही आणि गुरू होऊन बसले आहेत. 'ज्ञानी' पुरुषाकडून गुरूकिल्ली समजून घेतली पाहिजे. 'ज्ञानी' पुरुषाकडून गुरूकिल्ली आणली पाहिजे तर त्याची सेफसाईड (सुकर मार्ग) राहील.
म्हणून लोक आम्हाला विचारतात की, 'तुम्ही कोण आहात' मी म्हणालो, 'मी तर लघुत्तम पुरुष आहे. माझ्यापेक्षा छोटा जीव या दुनियेत दुसरा कोणीच नाही.' आता लघुत्तम पुरुष कधी कुठे बुडेल का?
प्रश्नकर्ता : नाही बुडणार.
दादाश्री : लघुत्तम! म्हणजे फक्त स्पर्श होईल पण बुडणार नाही. आणि माझ्यासोबत बसलेत, ते सुद्धा बुडणार नाहीत कारण ज्ञानी पुरुष स्वतः लघुत्तम असतात आणि तरणतारण झालेले असतात. स्वतः तरून गेलेले असतात आणि अनेक लोकांना तारण्यास समर्थ असतात.
फरक, ज्ञानी आणि गुरूमध्ये... प्रश्नकर्ता : गुरू आणि ज्ञानीपुरुष, या दोघांमधील फरक समजवा.
दादाश्री : ज्ञानी पुरुष आणि गुरूमध्ये तर पुष्कळ फरक आहे. गुरू नेहमी सांसारिक गोष्टींसाठी करण्यात येतात. मुक्तीसाठी तर, ज्ञानी पुरुषाशिवाय मुक्तीच नाही. गुरू तर आम्हाला संसारात पुढे घेऊन जातात आणि स्वतः जसे आहेत तसे आम्हाला बनवतात. याच्या पुढचे देऊ शकत