________________
गुरु-शिष्य
३९
मारले, शिव्या दिल्या, तरी सुद्धा त्यांना कषाय होत नाहीत. फक्त कषायरहित एवढेच नाही, तर बुद्धी पण नष्ट झालेली पाहिजे. बुद्धी असता कामा नये. या बुद्धीवंतांजवळ तुम्ही मोक्ष मागण्यास गेलात परंतु त्यांचाच मोक्ष झालेला नाही, मग तुमचा कसा होईल? म्हणजे चापट मारली तरी सुद्धा काही परिणाम होत नाही, शिव्या दिल्या तरी परिणाम होत नाही, चोप दिला तरी परिणाम होत नाही, तुरुंगात डांबले तरी सुद्धा परिणाम नाही. म्हणजे द्वंद नसते, द्वंद्वातीतच असतात ते. द्वंद्व समजता का तुम्ही? नफा-नुकसान, सुख-दुःख, दया-निदर्यता. जिथे एक असतो तिथे दुसरा असतोच, याला म्हणतात द्वंद्व! म्हणजे जो गुरू द्वंद्वातीत असेल, त्याला सद्गुरू म्हणता येईल.
या काळात सद्गुरू नसतात. क्वचितच कुठे तरी असतात, बाकी, सद्गुरू नसतातच! हे लोक गुरूंना गैर समजूतीमुळे सद्गुरू मानून बसले आहेत. त्यामुळेच तर हे सगळे फसले आहेत! नाही तर सद्गुरू भेटल्यानंतर चिंता होईल का?
मोठा फरक, गुरू आणि सद्गुरुंमध्ये प्रश्नकर्ता : प्रत्येक जण स्वतःच्या गुरूंनाच सद्गुरू मानून बसला आहे, हे काय आहे?
दादाश्री : आपल्या हिंदुस्तानात सर्व धर्माचे लोक आपापल्या गुरूला सद्गुरूच म्हणतात. फक्त गुरू कोणीच म्हणत नाही. परंतु याचा अर्थ लोकभाषेत आहे. जगात जे अतिशय उच्च चारित्र्यवाले गुरू असतात, त्यांना आपले लोक सद्गुरू म्हणतात. पण खरोखर त्यांना सद्गुरू म्हणता येत नाही. त्यांच्यात प्राकृतिक गुण खूप उच्च प्रकारचे असतात, त्यांना खाण्यापिण्यामध्ये समता असते, व्यवहारात समता असते. व्यावहारीक चारित्र्यगुण फार उच्च प्रकारचे असतात, परंतु त्यांना आत्मा प्राप्त झालेला नसतो. म्हणून त्यांना सद्गुरू म्हणता येत नाही.
असे आहे ना, गुरू दोन प्रकारचे असतात. एक गाईडरूपी गुरू असतात. गाईड म्हणजे आपण त्यांना फॉलो करावे (अनुसरावे) लागते. ते पुढे-पुढे चालतात मॉनिटरसारखे, त्यांना गुरू म्हणतात. मॉनिटरचा अर्थ