________________
गुरु-शिष्य
४७
दादाश्री : सद्गुरू हे रिलेटिव्ह आहेत, परंतु सद्गुरू जे ज्ञान देतात ते रियल आहे. त्या रियलमुळे आत्मरंजन होते. तो आनंद चरम कोटीचा आनंद आहे. रियल म्हणजे पर्मनेन्ट वस्तू आणि रिलेटिव्ह म्हणजे टेम्पररी वस्तू. रिलेटिव्हमुळे मनोरंजन होते.
प्रश्नकर्ता : तर मग सद्गुरू हे मनोरंजनाचे साधन आहे?
दादाश्री : हो! सद्गुरुंमध्ये ज्ञान असेल तर ते आत्मरंजनाचे साधन आणि ज्ञान नसेल तर ते मनोरंजनाचे साधन! आत्मज्ञानी सद्गुरू असतील तर आत्मरंजनाचे साधन. आत्मज्ञानी सद्गुरू असतील ना त्यांची तर निरंतर आठवण राहते, आणि तेच रियल, नाही तर सद्गुरूंची आठवण येतच नाही.
प्रश्नकर्ता : खऱ्या गुरूंना स्वतःचे सर्वस्व सोपवून दिले, त्यामुळे सर्व कार्य सिद्ध होतात. हे व्यवहारात किती अंशापर्यंत सत्य आहे?
दादाश्री : व्यवहारात तर हे पूर्ण सत्य आहे. गुरूंवर सोपवले तर त्याचा एक जन्म सुखाचा होतो. कारण गुरूंवर सोपवले म्हणजे गुरूंच्या आदेशानुसार चालला तर त्याला दु:ख राहत नाही.
गुरूकृपेचे परिणाम प्रश्नकर्ता : गुरू आणि गुरूकृपा यांची गोष्ट केली तर प्रश्न असा पडतो की गुरूकृपा म्हणजे काय नेमके? त्यात काही तथ्य आहे का?
दादाश्री : जितक्याही शक्ती आहेत ना, त्या सगळ्यांमध्ये तथ्यच असते, अतथ्य नसते. त्या सगळ्या शक्ती आहेत आणि शक्ती नेहमी काही वर्षांपर्यंत चालतात आणि नंतर हळूहळू संपत जातात.
प्रश्नकर्ता : गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी शिष्याला काय करावे लागते?
दादाश्री : शिष्याने तर गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरूंना खुश ठेवले पाहिजे, आणखी काही करायला नको. ज्या तहेने खुश राहतील त्या त-हेने त्यांना खुश ठेवावे. खुश ठेवल्याने कृपा उतरतेच. पण कृपा