________________
४८
गुरु-शिष्य
किती प्राप्त होते ? जितके टाकीत असेल, जितके गॅलन असतील त्याप्रमाणात होते. कृपादृष्टी म्हणजे काय? तर त्यांच्या सांगण्यानुसार करीत असतो म्हणून ते खुश राहतात, याचेच नाव कृपादृष्टी. आणि त्यांनी सांगितल्यापेक्षा उलट केले तर ते नाराज होतात.
प्रश्नकर्ता : मग गुरूंची कृपा सर्वांवरच असते असे नाही का?
दादाश्री : नाही, गुरूकृपा कित्येकांवर नसते सुद्धा. त्याने काही उलट केले तर कृपा होतही नाही.
प्रश्नकर्ता : मग त्यांना गुरू कसे म्हणता येईल? गुरूंची दृष्टी तर सर्वांवर सारखीच असली पाहिजे.
दादाश्री : हो, सारखी असली पाहिजे, पण तो मनुष्य गुरूंसोबत वाकडेपणा करत असेल तर काय करणार? ते जर ज्ञानी असतील तर एकसमानच असते. पण हे तर गुरू असतात, तिथे तुम्ही थोडा जरी वाकडेपणा केलात तर ते तुमच्यावरच उलटी करून टाकतील.
प्रश्नकर्ता : एकावर कृपा करतील आणि दुसऱ्यावर नाही, असे नसते. गुरूंची कृपा तर सर्वांवर एकसमानच असते ना?
दादाश्री : नाही, तरी पण आत जसे असेल तसे स्वत:चे फळ स्वतःला मिळते. स्वतः उलट केले तर उलटच फळ मिळते. परंतु ज्ञानी पुरुष तर वीतरागी म्हटले जातात. त्यांना तुम्ही चापट मारली तरी देखील ते तुमच्यावर समानदृष्टी ठेवणे सोडत नाहीत. मग तुम्ही जे टाकाल, एक शिवी दिलीत तर शंभर शिव्या तुम्हाला परत मिळतील. एक फूल अर्पण केलेत तर, शंभर फुले परत मिळतील.
अहंकार जातो कृपेमुळे की पुरुषार्थामुळे ? प्रश्नकर्ता : अहंकारापासून मुक्त होण्यासाठी स्व-पुरुषार्थाची गरज आहे की गुरूकृपेची गरज आहे ?
दादाश्री : कृपेची गरज आहे. ज्यांचा अहंकार गेला असेल अशा सद्गुरुंच्या कृपेची आवश्यकता आहे, तेव्हाच अहंकार जाईल. अहंकार