________________
गुरु-शिष्य
नष्ट करणे हे गुरूचे काम नाही, हे तर ज्ञानी पुरुषांचे काम आहे! गुरू असे ज्ञान कुठून आणतील? त्यांचाच अहंकार जात नाही ना! ज्यांची ममता गेलेली नाही, त्यांचा अहंकार कसा जाईल? ते तर जेव्हा ज्ञानी पुरुष भेटतील आणि ज्या ज्ञानीपुरुषामध्ये बुद्धीचा एक अंश सुद्धा नसेल, म्हणून त्यांच्याजवळ आपला अहंकार निघून जातो.
प्रश्नकर्ता : मग या कलियुगात गुरूद्वारे संचित कर्म नष्ट होऊ शकतात?
दादाश्री : गुरूंद्वारे तर नष्ट होत नाहीत, परंतु त्यासाठी ज्ञानी पुरुष असले पाहिजेत, भेदविज्ञानी ! ज्यांच्यात अहंकार नसेल, बुद्धी नसेल, असे भेदविज्ञानी असतील तर कर्म नष्ट होतात. आणि गुरू तर अहंकारी असतात, अहंकार असेपर्यंत असे काहीच होत नाही.
प्रश्नकर्ता : शास्त्रांमध्येही असे लिहिले आहे की गुरूगम्यच जाणले पाहिजे.
दादाश्री : हो, पण गुरूगम्य म्हणजे काय? आत्मा दिसला तरच त्यास गुरूगम्य म्हटले जाईल. नाही तर गुरूगम्य तर पुष्कळ लोक घेऊन फिरत असतात. आत्म्याचा अनुभव करवून दिला तर गुरूगम्य कामाचे ते तर जे आगम आणि आगमच्याही पुढे असतील, असे ज्ञानी पुरुष भेटले तर गुरूगम्य प्राप्त होते.
गुरूमंत्र, घसरू देत नाही प्रश्नकर्ता : प्रत्येक संप्रदायात आपापल्या गुरूंनी गुरूमंत्र दिलेला असतो, तर ते काय आहे?
दादाश्री : ते सगळे मागे पडू नयेत, घसरू नयेत यासाठी असे केले आहे. गुरूमंत्र जपून ठेवला तर तो घसरून पडणार नाही ना! परंतु त्याने मोक्षासंबंधीचे काहीच प्राप्त होत नाही.
प्रश्नकर्ता : गुरूंनी दिलेल्या नामस्मरणात साधारण मनुष्याने दिलेल्या नामस्मरणापेक्षा अधिक शक्ती असते का?