________________
गुरु-शिष्य
प्रश्नकर्ता : ही दुनियादारीची योग्यता नाही, पण याची योग्यता वेगळी आहे ना?
दादाश्री : नाही, सद्गुरू मिळाले, म्हणजे कोणत्याही योग्यतेची गरज नाही. सद्गुरू मिळाले हेच मोठे पुण्य समजले जाते.
प्रश्नकर्ता : मग सद्गुरू मिळाल्यानंतर कुठलीही साधना करावी लागत नाही का? फक्त सद्गुरूंमुळेच सर्व पूर्ण होते?
दादाश्री : नाही, ते जे साधन सांगतात तेच सर्व करावे लागते, परंतु तिथे योग्यतेची गरज नसते. योग्यतावाल्यांच्या मनात तर असे असते की, 'मला तर हे सर्व समजतेच ना!' योग्यता तर उलट नशा चढवते. योग्यता असेल तर त्यास टाकून देण्यासारखे नाही, ती असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण आपल्याला हे समजले पाहिजे की नशा चढली असेल तर नशा उतरायला तर हवी. ती योग्यता आणि सद्गुरूंचे मिलन यामध्ये नशा बाधक ठरते. योग्यतावाले अंतर राखून असतात. आणि कमी योग्यतावाला असेल ना, तो तर असेच म्हणेल, 'साहेब, मला तर अक्कलच नाही, मी आता तुमच्या शरणी आलो आहे. तुम्हीच माझी सुटका करुन द्या.' तेव्हा मग सद्गुरू खुश होतात. बस, इतकेच म्हणण्याची गरज आहे. सद्गुरू आणखी काहीच मागत नाहीत आणि कोणती योग्यताही शोधत नाहीत.
सद्गुरूंना सर्व समर्पण प्रश्नकर्ता : फक्त सद्गुरूंची भक्ती केली पाहिजे, असे आपले म्हणणे आहे ना?
दादाश्री : पूर्णपणे अर्पणता असावी. प्रश्नकर्ता : सद्गुरुंशी संपूर्ण समर्पणभावाने राहिले तर?
दादाश्री : तर काम होईल. समर्पण भाव असेल तर सर्व काम होते. मग काही शिल्लक राहणारच नाही. परंतु मन-वचन-कायेसहित समर्पण हवे.