________________
४४
गुरु-शिष्य
सापडणारच नाही. आपण विनयपूर्वक त्यांना विचारावे. असे न विचारताच बसून राहिलात म्हणून तर अनंत जन्म भटकतच राहिले ना, ते साहेब मधल्या स्टेशनवर राहत असतील आणि आम्ही पण तिथेच राहू, मग याचा काय फायदा?
प्रश्नकर्ता : तर मग सद्गुरूला शोधण्यासाठी पुस्तकी ज्ञान कसे उपयोगी पडेल?
दादाश्री : ते उपयोगी पडत नाही ना! त्यामुळेच तर हे भटकणे झाले. अनंत जन्मांपासून पुस्तकी ज्ञान शिकलो तरी सुद्धा भटकणे, भटकणे आणि भटकणे! सद्गुरूंची भेट होणे ही तर खूप मोठी गोष्ट आहे. परंतु ज्याला मुक्तीची कामना आहे, त्याला सर्व काही मिळते. मुक्तीची कामना हवी. आणि पुजले जाण्याची कामना असलेल्यांना उशीरच लागणार, कितीतरी जन्मांपर्यंत भटकतच राहावे लागेल. आपल्या लक्षात आले ना हे ? कशाची कामना आहे ? मान-पूजा आदीची कामना! 'या, या, या, शेठ!' म्हणतात, गर्वरस चाखतात. ते चाखणे सुद्धा राहून जाते ना लोकांचे! ते चाखण्याची मजा काही वेगळीच असते ना!
सद्गुरू भेटले हीच योग्यता प्रश्नकर्ता : सद्गुरू भेटल्यानंतर सद्गुरुंच्या आदेशानुसार साधना तर करावीच लागते ना?
दादाश्री : साधनेचा मग अंत होतो. सहा महिने किंवा बारा महिने लागतात. त्यासाठी चाळीस-चाळीस वर्ष लागत नाहीत.
प्रश्नकर्ता : ती तर जशी ज्याची योग्यता.
दादाश्री : योग्यतेची गरजच नाही. जर सद्गुरुंची भेट झाली, तर योग्यतेची गरजच उरत नाही. सद्गुरू भेटले नाहीत तर मात्र योग्यतेची गरज! सद्गुरू जर बी.ए. झाले असतील तर तितकी योग्यता आणि बी.ए.बी.टी. झाले असतील तर तेवढी योग्यता. त्यात आपल्या योग्यतेची गरजच नसते.