________________
गुरु-शिष्य
दादाश्री : नसतात. या काळात तर क्वचितच कुठे तरी असतील. नाही तर नसतातच! अशी माणसे कुठून आणायची? असा माल (असले गुण) असेल तर ही दुनिया उज्वलित नाही का होणार? प्रकाश नाही का होणार?
प्रश्नकर्ता : मग सद्गुरूशिवाय हे भव-जंजाळ कसे संपेल?
दादाश्री : हो, सद्गुरू नाहीत म्हणून तर हे सर्व अडून राहिले आहे ना!
प्रश्नकर्ता : श्रीमद्जी म्हणतात की सद्गुरूंना शरण जा, नवव्या जन्मात मोक्ष मिळेल, तर यात ते काय सांगू इच्छितात? ।
दादाश्री : सद्गुरूंना शोधणे ही कठीण गोष्ट आहे ना! तसे सद्गुरू येथे मिळतील असे नाही. ही सोपी गोष्ट नाही. सद्गुरू ज्ञानी असले पाहिजेत. ज्ञानी नसतील असे गुरू असतात, परंतु त्यांना संपूर्ण समज नसते. आणि ज्ञानी तर तुम्हाला संपूर्ण समज देतात, सगळी हकीगत समजावून सांगतात. ज्यांना कुठलीही गोष्ट जाणण्याची बाकी राहिली नाही त्यांना ज्ञानी म्हणतात! फक्त जैनांचेच जाणतात असे नाही, तर इतर सर्वच जाणतात त्यांना ज्ञानी म्हणतात! त्यांना भेटलात तर नवव्या जन्मात मोक्ष मिळेल किंवा दोन जन्मातही मोक्ष मिळेल असे आहे.
परंतु सद्गुरू मिळणे हे कठीणच आहे ना! आता तर खरे गुरूच नाहीत, मग सद्गुरू कसे असतील? आणि श्रीमद् राजचंद्रांसारखे सद्गुरू होते, पण तेव्हा लोक त्यांना ओळखू शकले नाहीत.
ओळखीनंतरच शरणागती प्रश्नकर्ता : अशा सद्गुरूंची ओळख कशी असते? त्यांना ओळखायचे कसे?
दादाश्री : ते तर प्रज्वलित दिव्यासारखे ओळखू येतील, असे असतात. त्यांचा सुगंध दरवळतो. पुष्कळ सुगंध दरवळतो.
प्रश्नकर्ता : पण सद्गुरूंना ओळखायचे कसे, की हेच खरे सद्गुरू आहेत?