________________
गुरु-शिष्य
काय पाहतात? मुलगी डोळ्यात भरेल अशी शोधतात. जर जाडी असेल तर तिच्या वजनाने जोर पडतो, डोळ्यांवरच जोर पडतो, वजन भारी वाटते! बारीक असेल तर त्याला दुःख होते. पाहताक्षणीच डोळ्यात समजते. त्याचप्रमाणे 'गुरू डोळ्यात भरतील असे' म्हणजे काय? तर आपल्या डोळ्यात सर्व प्रकारे फिट होतील, त्यांची वाणी फिट होईल, त्यांचे वागणे फिट होईल, असे गुरू करावेत !
प्रश्नकर्ता : हो, बरोबर आहे. असे गुरू असतील तरच त्याला त्यांचा आश्रय जाणवेल.
दादाश्री : हो, जर गुरू आमच्या हृदयात भरतील असे असतील, त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी आपल्याला आवडल्या तर आपण आश्रित होऊन जातो, मग आपल्याला दु:ख राहत नाही. गुरू, ही तर एक महान गोष्ट आहे. आपले मन स्थिारावले आहे असे वाटले पाहिजे. आपल्याला जगाचा विसर पाडतील अशांना गुरू करावे. ज्यांना पाहताक्षणीच आपण जग विसरून जातो, जगाची विस्मृती होते, अशांना गुरू करा. नाही तर गुरूचे माहात्म्यच उरणार नाही ना!
ती किल्ली समजून घ्यावी गुरूचे महात्म्य खुपच आहे पण कलियुग असल्यामुळे हे सगळे असे झाले आहे. दुषम काळामुळे गुरुंमध्ये स्वारस्य उरले नाही. गुरू वनस्पती तूपासारखे झाले आहेत, त्यामुळे काम होत नाही ना! आणि ते सगळे गुरूकिल्लीशिवायच वावरतात. हो, एक व्यक्ती मला म्हणाली की, 'तुम्ही तर आमचे गुरू आहात' मी म्हटले, 'नाही रे बाबा, मला गुरू म्हणू नकोस. मला ते आवडत नाही. गुरूचा अर्थ काय आहे ? बाहेर सगळीकडे विचारून ये' गुरूचा अर्थ वजनदार की हलका?
प्रश्नकर्ता : वजनदार
दादाश्री : मग वजनदार म्हणजे अवश्य बुडेल. तो तर बुडतोच पण त्यावर बसलेल्या सर्वांचीही जलसमाधी झालेली. जगात असेच होत आहे. मग मला गुरू कशाला करता! गुरुंना आपण विचारले पाहिजे की,