________________
गुरु-शिष्य
दर्शनानेच होतो नतमस्तक प्रश्नकर्ता : हो. गुरू केलेच पाहिजेत. गुरूशिवाय ज्ञान मिळत नाही, हा सिद्धांत बरोबर आहे..
दादाश्री : बरोबर आहे. आता 'गुरू' हे विशेषण आहे. 'गुरू' हा शब्दच नाही, 'गुरू' च्या विशेषणावरून गुरू आहे, म्हणजेच जर असे विशेषणवाले असतील तर ते गुरू आणि असे विशेषणवाले असतील तर ते भगवंत!
प्रश्नकर्ता : खऱ्या गुरूंची लक्षणे कोणती?
दादाश्री : जे गुरू प्रेम देतात, जे गुरू आपल्या हिताचाच विचार करतात तेच खरे गुरू. असे खरे गुरू कोठून मिळणार! गुरुंना असे पाहताक्षणीच आपले पूर्ण शरीर कुठलाही विचार न करता (त्यांच्या चरणांवर) झुकले जाईल.
म्हणूनच लिहिले आहे ना,
'गुरू ते कोने कहेवाय जेने जोवाथी शिश झूकी जाय' ('गुरू कोणास म्हणावे, की ज्यांना पाहताक्षणीच नतमस्तक होऊ.)
पाहताक्षणीच आपण नतमस्तक होतो, त्यांना म्हणतात गुरू. म्हणजे गुरू असतील तर त्यांचे विराट स्वरूप असले पाहिजे. तरच आपल्याला मुक्ती मिळेल, नाही तर मुक्ती मिळणार नाही.
गुरू, जे डोळ्यात भरतील असे प्रश्नकर्ता : गुरू कोणास करावे हाही एक प्रश्नच आहे ना?
दादाश्री : जिथे आपले मन स्थिरावेल त्यांना गुरू करा. मनाची स्थिरता झाल्याशिवाय गुरू करू नका. म्हणून आम्ही काय म्हटले आहे की जर गुरू करणार असाल तर ते डोळ्यात भरतील असे गुरू करा.
प्रश्नकर्ता : 'डोळ्यात भरतील असे' म्हणजे काय? दादाश्री : हे लोक लग्न करतात तेव्हा मुली बघतात, तेव्हा ते