________________
३४
गुरु-शिष्य
'हे गुरू महाराज, तुमच्याजवळ तुम्ही बुडणार नाहीत अशी गुरूकिल्ली आहे का? तुम्ही तर वजनदार आहात म्हणून बुडल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हालाही बुडवाल. तेव्हा तुमच्याजवळ गुरूकिल्ली आहे का? तुम्ही बुडाल असे तर नाही ना? तरच मी तुमच्याजवळ बसेन.' त्यांनी 'हो' म्हटले तर बसावे.
प्रश्नकर्ता : असे तर कोणीच म्हणणारच नाही की, मी बुडेन असा आहे?
दादाश्री : हो, पण आपण म्हणायचे ना की 'साहेब, तुम्हाला अक्कल जरा कमी आहे' असे बोलल्यावर लगेच कळेल की हे बुडतील असे आहेत की नाही! ___नाही तर बिन गुरूकिल्लीचे सर्व गुरू बुडलेच आहेत. ते तर बुडलेच, पण सर्व शिष्यांना सुद्धा बुडवले. मग कुठे जातील याचाही काही ठिकाणा नाही. गुरुंजवळ गुरूकिल्ली असेल तर ते बुडणार नाहीत. कारण पूर्वी गुरूंचे जे गुरू होते ना, ते परंपरागत किल्ली देत असत. आपल्या शिष्यांना काय सांगत असत? की तुम्ही गुरू व्हा पण ही गुरूकिल्ली तुमच्याजवळ ठेवा. म्हणजे तुम्ही बुडणार नाही आणि बुडवणार सुद्धा नाही. आजकालच्या गुरूंना मी विचारतो की, 'गुरूकिल्ली आहे का?' (तेव्हा ते विचारतात) 'ती कुठली किल्ली?' मग तर हे भटकून मेले. वर कुणाला बसू देऊ नका. ही गुरूकिल्ली तर विसरूनच गेलेत. गुरूकिल्लीचा काही ठावठिकाणा नाही. हे कलियुग आहे म्हणून बुडतात, सतयुगात बुडत नव्हते.
प्रश्नकर्ता : पण गुरूतर तारणहार असतात, ते बुडवित नाहीत.
दादाश्री : नाही, पण त्यांच्याजवळ गुरूकिल्ली असेल तर ते स्वतः तरतील आणि दुसऱ्यांनाही तारतील. जर गुरूकिल्ली नसेल ना, तर तू दुःखी होशील. लोक तर वाहवा-वाहवा करतीलच ना, पण नंतर त्या गुरूंचा मेंदू फाटेल. मेंदूची नसच तुटून जाईल. माझी वाहवा-वाहवा करीत नाहीत का लोक? म्हणजे गुरूकिल्ली असेल तर कामाचे. गुरूकिल्ली म्हणजे असे काही स्वत:जवळ साधन असणे की जी किल्ली बुडू देत नाही. ती किल्ली म्हणजे समज आहे, आणि गुरू ती खाजगीत-प्रायव्हेटली