________________
१८
गुरु-शिष्य
सांगितले आहे की निमित्ताशिवाय कुठलेही काम होणार नाही. म्हणून 'उपादान असेल तर निमित्त येऊन मिळेल, निमित्ताची गरज नाही' ही तीर्थंकरांची गोष्ट नाही किंवा श्रीमद् राजचंद्राचीही गोष्ट नाही. असे विधान जे करतात त्यांची जबाबदारी आहे. यात दुसऱ्या कोणाचीही जबाबदारी नाही.
कृपाळुदेवांनी एक गोष्ट सांगितली आहे की, 'दुसऱ्या कोणाचा शोध घेऊ नकोस, केवळ एका सत्पुरुषास शोधून त्यांच्या चरणकमळावर सर्व भाव अर्पण करून वर्तत जा. तरी सुद्धा जर मोक्ष मिळाला नाही तर माझ्याकडून घेऊन जा.' नाही तर असेच लिहिले असते ना की तू आपला घरी झोपून रहा, आणि उपादान जागृत करत रहा, तर तुला निमित्त येऊन मिळेल.
ती गोष्ट खरी, पण निश्चयात प्रश्नकर्ता : दुसरी एक अशी पण मान्यता आहे की 'निमित्ताची आवश्यकता आहे यास तर स्वीकृती आहे पण निमित्त काहीच करू शकत नाही ना!
दादाश्री : निमित्त काहीच करू शकत नाही असे जर कधी झाले ना, तर मग काही शोधायचे राहिलेच नाही ना! पुस्तक वाचण्याचीही काय गरज आहे? मंदिरात जाण्याची काय गरज? कोणी बुद्धीमान व्यक्तीने विचारले की, 'साहेब, मग तुम्ही येथे कशासाठी बसला आहात? आम्हाला तुमचे काय काम आहे ? ही पुस्तके कशासाठी छापली आहेत? मंदिर कशासाठी बांधले आहे? कारण निमित्त तर काहीच करू शकत नाही ना!' असे म्हणणाराही कोणी निघेल की नाही?
आंधळा मनुष्य जर असे म्हणेल की, 'मी माझे डोळे बनवीन आणि मी पाहीन, तरच खरे.' तेव्हा आपण हसू की नाही? अशा या सर्व गोष्टी करतात. शाळेत एक शिक्षक आहेत, त्यांना मुलांची गरज आहेच पण मग मुलांना शिक्षकांची गरज नाही (!) काय हा वेडेपणा चालला आहे! ज्यांना निमित्त म्हणतात, ज्ञानीपुरुष किंवा गुरू, ते सगळे निमित्त म्हटले जातात, त्यांनाच उडवून टाकतात.