________________
गुरु-शिष्य
दादाश्री : खोट्याचे ज्ञान व्हायला पाहिजे. एका माणसाने मला सांगितले की, 'हे खोटे आहे' असे मला ज्ञान झाले. मला तर एवढेच हवे होते. कारण हे तर अनिश्चित राहते, यात शंका राहते की हेही थोडे खरे आहे आणि तेही थोडे खरे आहे. तोपर्यंत तर त्यातून काही तथ्य निघणार नाही. 'हे खोटे आहे' समजले पाहिजे, त्यानंतर समाधान वाटेल.
म्हणजे स्पष्ट कोणी बोलतच नाहीत आणि असेच सर्व चालवत राहतात. माझ्यासारखे 'ज्ञानी पुरुष' असे स्पष्ट बोलू शकतात, आणि मी जसे आहे तसे बोलू शकतो.
'आहे निमित्त,' तरी सुद्धा 'सर्वस्व'च तुम्ही विचारा, सगळे काही विचारू शकता, कुठलाही प्रश्न विचारु शकता. पुन्हा असा योग जुळून येणार नाही. म्हणून सगळे काही विचारा. प्रश्न चांगले आहेत आणि हे सर्व ज्ञान प्रकट होईल तेव्हाच लोकांना समजेल ना! आम्ही तुम्हाला अगदी शेवटपर्यंतची गोष्ट सांगू. तुम्ही विचाराल तसे आम्ही उत्तर देऊ.
प्रश्नकर्ता : असे सुद्धा म्हटले जाते की ज्ञान गुरूकडून सुद्धा होत नाही आणि गुरूशिवाय सुद्धा होत नाही. हे समजवा..
दादाश्री : गोष्ट खरीच आहे ना! जर कधी गुरूने असे सांगितले की, 'माझ्यामुळे झाले' तर ती खोटी गोष्ट आहे आणि शिष्याने म्हटले की, 'गुरूशिवाय झाले' तर ती गोष्टही खोटी आहे. आम्ही काय म्हटले? की हे तुमचेच तुम्हाला देत आहोत. आमचे काही सुद्धा देत नाही.
प्रश्नकर्ता : पण त्यासाठी आपण निमित्त तर आहातच ना?
दादाश्री : हो, निमित्त तर आहेच ना! आम्ही स्वत:च तुम्हाला सांगतो ना की, आम्ही तर निमित्त आहोत. केवळ निमित्त! पण तुम्ही जर निमित्त मानले तर तुमचे नुकसान होईल, कारण उपकारी भाव निघून जाईल. जितका उपकारी भाव तेवढा अधिक चांगला परिणाम तुम्हाला मिळेल. उपकारी भावालाच भक्ती म्हटली आहे.