________________
गुरु-शिष्य
प्रश्नकर्ता : म्हणजे जे गुरू आम्ही पाहिलेच नाहीत, ते काहीच मदत करत नाहीत?
दादाश्री : ते दोन आणे मदत करतात. एकाग्रतेचे फळ मिळते आणि ते सुद्धा भौतिक फळ मिळते. त्यापेक्षा तर आत्ताचे 'चार आणे कमी' फळ देणारे गुरू बरे.
प्रश्नकर्ता : ज्या गुरूंनी समाधि घेतली असेल, ते गुरू नंतर आपल्याला मदत करतात?
दादाश्री : ज्या गुरूंनी समाधि घेतली असेल, त्यांच्या जिवंतपणीच जर आपला त्यांच्याशी संबंध आला असेल, त्यांचे प्रेम संपादन केले असेल, त्यांची कृपा प्राप्त केली असेल आणि नंतर त्यांनी देहत्याग केला असेल, तर त्यांची समाधि असेल तरीही काम होते ना! एकदा तरी ओळख झाली पाहिजे. परंतु ज्यांनी पाहिलेच नसेल त्यांचे काम होत नाही, मग त्यांच्या समाधिवर डोके फोडले तरी त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही.
__ हे तर महावीरांचे फोटोही उपयोगी पडत नाहीत आणि कृष्ण भगवंताचे फोटो देखील उपयोगी पडत नाहीत. प्रत्यक्ष असतील तरच उपयोगाचे. लोक किती जन्मांपासून महावीर आणि कृष्ण भगवंतांना भजत आले आहेत. लोकांनी काही कमी भक्ती केली आहे ? भक्ती करून करून थकून गेले. रोज मंदिरामध्ये जाऊन सुद्धा धर्मध्यान साधले जात नाही! शिवाय यामध्ये पण मुदत असते. या औषधांची सुद्धा मुदत संपण्याची तारीख असते, ती तुम्हाला माहीत आहे ना? एक्सपायरी डेट! (मुदत संपण्याची तारीख) तसे येथे सुद्धा आहे. परंतु लोक तर समजल्याशिवायच जे आत्ता हजर नाहीत त्यांचेच गुणगान करीत राहतात.
प्रश्नकर्ता : जिवंत गुरूची एवढी अपेक्षा का राहत असेल?
दादाश्री : जिवंत गुरू नसेल तर काहीच होत नाही, काही साध्य होत नाही. त्यांच्यापासून फक्त भौतिक लाभ होतो. कारण तितका वेळ चांगल्या कामात घालवला, त्याचा लाभ होतो. जर गुरू स्वतः येथे हजर