________________
गुरु-शिष्य
आहे. जिवंत मूर्ती आहेत ते. तेव्हा जिथे प्रत्यक्ष उपस्थित असतील तिथे जावे. भगवंताच्या मूर्तीचे सुद्धा दर्शन करा, दर्शन करण्यात काहीच गैर नाही. कारण त्यात आपली भावना आहे आणि पुण्यही बांधले जाते, म्हणून मूर्तीचे दर्शन घेतले तरी चालेल. पण मूर्ती आपल्याशी काही बोलत नाही. कोणी सांगणारा तर हवाच ना? सांगणारा नको का? मग असा कोणी शोधून काढला नाही?
प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : मग आता केव्हा शोधणार?
स्वछंद थांबतो, प्रत्यक्षच्या अधीनच म्हणून म्हटले आहे ना की सजीवन मूर्तीशिवाय एकटे पडू नका. कोणी तरी सजीवन मूर्ती शोधून काढा आणि मग तिथे त्यांच्याजवळ बसा. तुझ्यापेक्षा तर ते दोन आणे तरी चांगले असतील.तू बारा आणे असशील तर चौदा आणेवाल्या मूर्तीपाशी जाऊन बैस. पूर्वी जे होऊन गेले आहेत, ते आज तुझे दोष दाखवण्यासाठी येणार नाहीत. जे सजीवन असतील तेच दोष दाखवतील.
म्हणूनच कृपाळुदेवांनी सांगितले आहे ना, 'सजीवन मूर्तीच्या लक्ष्यशिवाय जे काही पण करण्यात येते, ते या जीवासाठी बंधनरुप आहे. हे आमचे हृदय आहे.' हे एकच वाक्य इटसेल्फ (स्वत:च) सर्व काही सांगून जाते. कारण सजीवन मूर्तीशिवाय जे काही कराल तो स्वछंद आहे. जर प्रत्यक्ष हजर असेल तरच स्वछंद थांबेल. नाही तर स्वछंद कोणाचाच थांबत नाही.
प्रश्नकर्ता : पण जर प्रत्यक्ष सद्गुरूंचा योग नसेल तर जे सद्गुरू होऊन गेले आहेत, त्यांची जी वचने असतील, त्यांचा आधार घेऊन जर पुरुषार्थ केला तर त्याला समकित प्राप्त होईल, असे सुद्धा म्हटले आहे. ही गोष्ट खरी आहे की नाही?
दादाश्री : ते तर करतातच ना! आणि समकित झाल्यानंतर तरी ताप उतरला आहे हे लक्षात येईलच ना! समकित झाले तर ताप उतरला