________________
२८
गुरु-शिष्य
असतील तरच ते तुमचे दोष दाखवतील व तुम्हाला दोष मुक्त करतील. तुमच्या सगळ्या चुका तुम्हाला दिसू लागल्यानंतर गुरूची गरज भासत नाही. आमच्या सगळ्याच चुका आम्हाला दिसतात त्यामुळे या जगात फक्त आम्हालाच गुरूची आवश्यकता नाही. बाकी तर सर्वांना गुरूची आवश्यकता आहे. जे गुरू या जगातून निघून गेले आहेत, जे आता हयात नाहीत, त्यांचे गुणगान करीत राहिलात तर त्यातून काहीही साध्य होत नाही.
प्रश्नकर्ता : अर्थात गुरूच्या रुपात मूर्ती किंवा फोटो असेल तरीही ते चालणार नाही ? !
दादाश्री : काहीही चालणार नाही. तो फोटो हस्ताक्षर करू शकत नाही. आज आम्ही इंदिरा गांधींचा फोटो घेऊन बसलो तर त्यांचे हस्ताक्षर घेऊ शकतो का ? म्हणून आज जे जिवंत आहेत, तेच हवेत. आज इंदिरा गांधी किंवा जवाहरलाल नेहरू काहीही मदत करू शकत नाहीत. आत्ता जे हजर आहेत तेच मदत करू शकतील. दुसरे कोणीही मदत करू शकत नाही. हजर असतील त्यांचे हस्ताक्षर चालेल, जरी पूर्ण हस्ताक्षर नसले तरी त्यांची इनिशिअल्स (आद्याक्षर) असतील तरीही चालेल आणि इंदिरा गांधींचे पूर्ण हस्ताक्षर असले तरी सुद्धा चालणार नाही.
मूर्ती ही सुद्धा परोक्ष भक्ती
प्रश्नकर्ता : एक संत म्हणतात की या ज्या जड वस्तू आहेत जसे की मूर्ती, फोटो यांचे अवलंबन घेऊ नये. जे तुमच्या नजरेसमोर जिवंत (गुरू) दिसतात, त्यांचा आधार घ्यावा.
दादाश्री : ते योग्यच सांगतात की जर कुणी चांगले, जिवंत गुरू भेटले तर आपल्याला आपली संतुष्टी होते. पण जोपर्यंत गुरू भेटत नाहीत, तोपर्यंत मूर्तीचे दर्शन घ्यावे. मूर्ती ही पायरी आहे, ती पायरी सोडून चालणार नाही. जोपर्यंत अमूर्त प्राप्त होत नाही, तोपर्यंत मूर्ती सोडून चालणार नाही. मूर्ती नेहमी मूर्तच देणार. मूर्ती अमूर्त देऊ शकत नाही. स्वत:चा जो गुणधर्म असेल तोच बजावणार ना ! कारण मूर्ती ही परोक्ष भक्ती आहे. गुरू सुद्धा परोक्ष भक्ती आहे, परंतु गुरूमध्ये लवकर प्रत्यक्ष भक्ती होण्याचे साधन