________________
गुरु-शिष्य
मागे-मागे गेलो असतो! पण त्यांचे ज्ञान खरे आहे. त्यांना अंतिम दशेमध्ये जे ज्ञान प्रकट झाले, ते आत्मज्ञान प्रकट झाले होते.
प्रश्नकर्ता : पण दादाजी आपल्यालाही जे ज्ञान झाले, ते गुरूशिवायच झाले ना?
दादाश्री : हा सगळा आम्ही मागचा हिशोब घेऊन आलो आहोत. पूर्वी गुरू भेटले होते, ज्ञानी भेटले होते त्यांच्याकडून सामान घेऊन आलो होतो. पण कोणत्यातरी चुकीमुळे ते थांबले गेले असावे. म्हणून या जन्मात गुरू भेटले नाहीत पण मागच्या जन्माचे गुरू असतीलच ना? मागच्या जन्मात गुरू भेटले असतील आणि या जन्मात ज्ञान प्रकट झाले!
___ या जन्मात तर मला असा काही विश्वास नव्हता की इतके अगाध ज्ञान प्रकट होईल. पण तरी ते सुरतच्या स्टेशनवर अचानकच प्रकट झाले. तेव्हा माझी खात्री पटली की हे तर आश्यर्यकारक विज्ञान आहे! लोकांचे पुण्य उदयास आले असावे. कोणाला तरी निमित्त बनवावेच लागते ना? तर आता लोक समजतात की दादानां ज्ञान असेच प्रकट झाले, परंतु तसे नाही, मागच्या जन्मात गुरू केले होते, त्याचे हे फळ प्राप्त झाले. तात्पर्य, गुरूशिवाय काहीही साध्य होत नाही. गुरू परंपरा चालूच राहणार आहे.
जिवंत गुरूंचेच महत्त्व प्रश्नकर्ता : गुरू हयात नसतील तरी सुद्धा स्वत:च्या शिष्यास मार्गदर्शन देतात की नाही?
दादाश्री : प्रत्यक्ष गुरू असतील तरच कामाचे. परोक्ष तर कामाचेच नाहीत. सदेह हजर नसणारे असे परोक्ष गुरू काहीही मदत करत नाहीत. तरी देखील परोक्ष गुरू कशा प्रकारे मदत करतात? तर जे गुरू आपल्याला भेटले असतील आणि दहा-पंधरा वर्षे आपल्याला त्यांचा लाभ मिळाला असेल, आपण त्यांची सेवा केली असेल व त्या गुरूंबरोबर दहा-पंधरा वर्षे संलग्नता राहिली असेल, आणि त्यानंतर जर त्यांचा देहांत झाला असेल तर मात्र थोडा लाभ मिळू शकतो. नाही तर डोकेफोड करून सुद्धा काहीही लाभ होत नाही!