________________
गुरु-शिष्य
त्यांना गुरू म्हटले जाते. आमचा असा कोणताच संबंध स्थापित झाला नाही, प्रत्यक्ष कोणीच भेटले नाही.
२५
कृपाळुदेवांवर अधिक भाव होता! पण ते प्रत्यक्ष नव्हते. म्हणून त्यांचा गुरूच्या रूपात स्वीकार करत नाही. गुरूप्रमाणे स्वीकार केला असे मी कोणाला म्हणेल ? तर प्रत्यक्ष मला सांगतील, प्रत्यक्ष आदेश देतील, उपदेश करतील त्यांना मी गुरू म्हणेल. कृपाळुदेव मला पाचच मिनींटासाठी जरी भेटले असते ना, तरी मी त्यांची गुरूपदी स्थापना केली असती, असे मला समजले होते! मी गुरूपदी कोणालाही स्थापन केले नव्हते. इतर संतांचे मी दर्शन घेतले होते. पण त्या गुरूपदावर जर माझे अंत:करण स्थिरावेल तरच मी गुरू करेल, नाही तर गुरू करणार नाही. ते संत खरे होते, ही गोष्ट नक्की पण आपल्या मनाची संतुष्टी झाली पाहिजे ना. पण आपले अंतःकरण त्यांच्या ठिकाणी स्थिरावले पाहिजे ना !
उपकार, पूर्वीच्या गुरूंचे
आता, या जन्मात माझे गुरू नाहीत, याचा अर्थ असा होत नाही की मला कधीच गुरू नव्हते.
प्रश्नकर्ता : म्हणजे मागच्या जन्मात तुमचे गुरू होते ?
दादाश्री : गुरूशिवाय तर मनुष्य पुढे येतच नाही. गुरूशिवाय तर पुढे आलेलेच नसतात. माझे म्हणणे असे आहे की बिन गुरूचे कोणी असूच शकत नाही.
प्रश्नकर्ता : मग मागच्या जन्मी तुमचे गुरू कोण होते ?
दादाश्री : ते खूप चांगले गुरू असतील, पण ते आता आम्हाला कसे समजणार!
प्रश्नकर्ता : श्रीमद् राजचंद्रांचे सुद्धा गुरू होते ना ?
दादाश्री : त्यांना या जन्मात गुरू लाभले नव्हते. त्यांनी एवढे लिहिले आहे की आम्हाला जर सद्गुरू मिळाले असते तर आम्ही त्यांच्या