________________
२२
गुरु-शिष्य
प्रश्नकर्ता : दादाजी, आम्ही जर आपल्याला निमित्त मानले तर उपकारी भाव निघून जातो, हे समजले नाही.
दादाश्री : आम्ही तर तुम्हाला सांगतो की आम्ही निमित्त आहोत पण तुम्ही जर आम्हाला निमित्त मानले तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. तुम्ही उपकार मानलेत तर फळ मिळेल, हा नियमच आहे या जगाचा. पण हे निमित्त असे आहे की मोक्षास घेऊन जाणारे निमित्त आहे. म्हणून महान उपकार माना. तिथे अर्पण करण्यास सांगितले आहे. फक्त उपकारच मानायचे एवढेच नाही पण मन-वचन-काया सर्व अर्पण करा. सर्वस्व अर्पण करायला वेळच लागणार नाही असा भाव यायला हवा.
वीतरागांनी सुद्धा म्हटले आहे की ज्ञानीपुरुष तर असे म्हणतात की 'मी तर निमित्त आहे' पण मुमुहूंनी ते निमित्त आहेत' असे कधीही मानू नये. मुमुक्षूनी निमित्तभाव दाखवू नये की 'ओहो, तुम्ही तर निमित्त आहात, मग यात तुम्ही काय करणार?' 'तेच आमचे सर्वस्व आहेत' असेच त्यांनी बोलावे. नाही तर याला व्यवहार चुकलात असे म्हटले जाईल. तुम्ही तर असेच म्हणावे की हेच 'आम्हाला मोक्षाला घेऊन जाणारे आहेत' असे म्हणावे. आणि ज्ञानी पुरुष असे सांगतात की 'मी निमित्त आहे', अशा तहेचा दोघांचा व्यवहार म्हटला जातो.
वस्तुस्तिथीत हा इतका सरळ मार्ग आहे, समभाव असलेला मार्ग आहे, अजिबात अडचणरुप नाही आणि तरी सुद्धा मार्ग दाखविणारे आणि कृपा करणारे स्वतः काय म्हणतात? की 'मी निमित्त आहे.'' पाहा ना, डोक्यावर पगडी घालत नाही ना, नाही?' नाही तर किती मोठी (मानाची) पगडी घालून फिरतील! म्हणजे आम्ही देणारे सुद्धा नाही, आम्ही तर निमित्त आहोत. डॉक्टरकडे गेल्यावर रोग बरा होतो. सुताराकडे गेल्यावर रोग बरा होईल का?
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : म्हणून ज्या गोष्टींचे जे निमित्त आहेत, तिथे गेलो तरच आपले काम होईल. म्हणून क्रोध-मान-माया-लोभ घालवायचे असतील, हे सगळे अज्ञान दूर करायचे असेल, तर ज्ञानींकडे जावे लागेल.