________________
गुरु-शिष्य
५
पुस्तके निमित्त आहेत, मंदिरे निमित्त आहेत, जिनालय निमित्त आहेत. ज्ञानी पुरुष निमित्त आहेत. आता ही सर्व पुस्तके, मंदिरे नसतील तर या उपादानाचे काय होईल? म्हणजे निमित्त असेल तरच काम होईल. अन्यथा काम होणार नाही.
चोवीस तीर्थंकरांनी पुन्हा पुन्हा हेच सांगितले की, 'निमित्तास भजा. उपादान जरी कमी असेल तरी पण निमित्त मिळाल्यावर त्याचे उपादान जागृत होईल.' पण तरी उपादानाबद्दल सांगतात ते यासाठीच की तुला निमित्त मिळाल्यानंतर सुद्धा तू जर उपादान अजागृत ठेवलेस, उपादान जागृत ठेवले नाहीस आणि डुलकी घेतलीस तर तुझे काम होणार नाही, व तुला मिळालेले निमित्त व्यर्थ जाईल. म्हणून सावध रहा, असे त्यांचे म्हणणे आहे.
उपादान म्हणजे काय? तर तयार ठेवणे, तूप तयार ठेवणे, वात तयार ठेवणे, हे सर्व तयार ठेवणे. लोकांनी तर हे सर्व अनंत जन्मांपासून तयारच ठेवले आहे पण फक्त दिवा प्रज्वलित करणारा कोणी भेटला नाही. तूप, वात सर्व काही तयार आहे पण प्रज्वलित करणारा हवा! अर्थात मोक्ष प्राप्तीसाठी निमित्त होतील अशी शास्त्रे मिळाली नाहीत, आणि मोक्षप्राप्ती करवून देणारे निमित्त असे ज्ञानी पुरुषही भेटले नाहीत. ही सगळी साधने उपलब्ध होत नाहीत. निमित्त भेटत नाही म्हणून तर सतत भटकत राहतात.
लोक निमित्ताला अशा प्रकारे समजले आहेत की, 'उपादान तयार असेल तेव्हा तुला निमित्त आपोआप मिळेल.' परंतु आपोआप मिळेल याचा अर्थ असा होत नाही. भावना तर असलीच पाहिजे. भावनेशिवाय तर निमित्त देखील भेटत नाही.
___ म्हणजे या गोष्टीचा दुरुपयोग झाला आहे. निमित्त असे सांगतात की निमित्ताची गरज नाही! स्वतः निमित्त असून सुद्धा असे बोलतात.
प्रश्नकर्ता : हो, असे श्रीमद् राजचंद्र सुद्धा सांगतात. दादाश्री : फक्त श्रीमद् राजचंद्रच नाही, तीर्थंकरांनी सुद्धा हेच