________________
गुरु-शिष्य
की याच्या आईने काय याला कधी खीर खायला दिलीच नाही? मग समजा, तिथे तुला खीर वाढली आणि ती तू नाही खाल्लीस तर ते किती वाईट दिसेल. म्हणून तू थोडी-थोडी खायला सुरुवात कर. अशा त-हेने ती माझी समजूत काढायची. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. म्हणजे खीरीविषयी जी चीड बसली ती बसलीच. तशीच त्यांना गुरूच्या बाबतीत चीड निर्माण झाली.
प्रश्नकर्ता : परंतु गुरूसाठी अशी चीड का निर्माण झाली?
दादाश्री : ते तर मागच्या जन्मी गुरूंशी काही तरी भानगड झाली असेल, त्यामुळे आज त्यांच्याप्रति चीड निर्माण होते. प्रत्येक बाबतीची चीड निर्माण होते ना! कित्येकांना गुरूविषयी नाही पण भगवंतावर चीड उत्पन्न होते. म्हणजे अशा प्रकारे ते गुरू करण्यासाठी नकार देतात, जसे की ती उलटी दुसऱ्याच कारणांमुळे झाली होती पण खिरीवरच चीड उत्पन्न झाली, त्याप्रमाणे.
म्हणजे 'गुरूशिवाय चालते' असे म्हणणारे संपूर्ण जगाचे विरोधी आहेत. कारण ते स्वतःची चूक दुसऱ्यांवर ढकलून देतात. तुम्हाला कशी वाटते ही गोष्ट?
प्रश्नकर्ता : बरोबर आहे.
दादाश्री : एखाद्या गुरूबरोबर काही भानगड झाली असेल म्हणून मनात ठाम बसते की गुरू करूच नये. आता तुम्ही जर गुरूकडून दुखावले गेले असाल तर तुम्ही गुरू करू नका पण स्वतःचा अनुभव दुसऱ्यांवर लादू नका. एखाद्या गुरुंचा मला वाईट अनुभव आला असेल म्हणून मी असे सांगू शकत नाही की सगळ्यांनीच गुरू करु नये. स्वतःचा पूर्वग्रह स्वतःजवळच ठेवला पाहिजे. लोकांना ती गोष्ट सांगू नये. लोकांना उपदेश देऊ नये की असे करू नका. कारण गुरूशिवाय जगाचे चालणारच नाही. कुठल्या वाटेने जायचे हे सुद्धा विचारावे लागते की नाही?
प्रश्नकर्ता : हो.