________________
१४
गुरु-शिष्य
दादाश्री : या दुनियेत कोणी माणूस असा निघाला नाही की जो गुरूच्या विरुद्ध असेल. 'गुरू नको' हे शब्द सुद्धा कोणत्याही मनुष्याने बोलता कामा नये. अर्थात गुरू नको, या सगळ्या विरोधाभास असलेल्या गोष्टी आहेत. कोणी असे म्हटले की, 'गुरूची आवश्यकता नाही' तर ती एक दृष्टी आहे, त्याचा दृष्टीराग आहे हा.
म्हणजे एवढी गोष्ट समजण्याची गरज आहे की या जगात गुरूची आवश्यकता तर आहेच. गुरूवर चिडून चालणार नाही. गुरू या शब्दाने लोक अतिशय भडकले आहेत! आता यात मुख्य तत्त्वाचा आणि या गोष्टीचा काय संबंध?
गुरूची गरज तर शेवटपर्यंत हे तर 'गुरूची गरज नाही' असे म्हणून आपला 'व्ह्यू पॉईंट' (दृष्टिकोन) ठेवला आहे. बाकी काही नाही. एखादा अनुभव असा आला असेल की सगळ्या ठिकाणी फिरल्यानंतर, असे करता, करता, करता स्वतःला आतूनच समाधान मिळू लागले, या श्रेणीत आलेत! म्हणून मग मनाला असे वाटू लागले की गुरू करणे, हे व्यर्थ ओझे आहे.
प्रश्नकर्ता : 'गुरूची गरज नाही' असे म्हणतात, पण ते एका ठराविक स्टेजला पोहोचल्यानंतर गुरू कामी येत नाहीत. त्यानंतर मग तुमच्या स्वतःवरच आधारीत असते.
दादाश्री : ते तर कबीरांनी सुद्धा सांगितले आहे की: 'कबीर हदका गुरू है, बेहदका गुरू नहीं!'
म्हणजे गुरूची गरज शेवटपर्यंत पडेल. 'बेहद' येईपर्यंत तर दमछाक होते.
प्रश्नकर्ता : सांसारिक कामात गुरूची गरज आहे, व्यावहारिक ज्ञानात गुरूची गरज आहे. परंतु स्वत:ला, म्हणजे आपण जसे आहोत तसे पाहाण्यासाठी गुरूची गरज नाही, असेच ना?
दादाश्री : संसारात सुद्धा गुरू पाहिजे आणि मोक्षमार्गात सुद्धा गुरू