________________
गुरु-शिष्य
जाईलच कसा? रस्त्याने चालताना आपल्याला ठेच लागली तर त्या ठेचेलाही असे वाटते की, 'तू खाली बघून चाललास तर काय वाईट आहे ?' अर्थात सर्वच गुरू, जिकडे-तिकडे मला सगळेच गुरू वाटलेले. जिथून लाभ झाला त्यास गुरू मानावे. ठेचेपासून लाभ झाला तर आपण ठेचेला गुरू मानावे. मी तर आशा त-हेने लाभ प्राप्त केले आहेत सगळे.
बाकी गुरूवर चिडता कामा नये. गुरूवर चिडल्यामुळे तर आज ज्ञान अडकून राहिले आहे !!
___ गुरू-विरोधी, पूर्वग्रहाने ग्रासित म्हणजे गुरू केल्याशिवाय चालेल असे नाही. 'गुरूशिवाय चालेल' असे म्हणणारे विरोधाभासात आहेत. या दुनियेत गुरू केल्याशिवाय कधीही काहीही चालत नाही. मग ती टेक्निकल बाब असो किंवा इतर कोणतीही बाब असो. तेव्हा 'गुरूची आवश्यकता नाही' हे वाक्य लिहिण्यासारखे नाही. लोकांनी मला विचारले की 'बरेच लोक गुरूच्या बाबतीत असे का म्हणतात?' मी म्हटले ते जाणून-बुजून बोलत नाहीत, दोषपूर्वक बोलत नाहीत, गुरूविषयी त्यांची जी चीड आहे, ती पूर्वजन्मातची चीड आहे आणि तीच आज जाहीर करत आहेत.
प्रश्नकर्ता : गुरूविषयीची चीड निर्माण का झाली असावी?
दादाश्री : हे जे लोक असे म्हणतात की 'गुरूची आवश्यकता नाही' ही कशासारखी गोष्ट आहे ? एकदा लहानपणी मी खीर खात होतो आणि मला उलटी झाली. आता उलटी दुसऱ्याच कारणांमुळे झाली होती, खीरीमुळे नाही. पण मला खीरीविषयी चीड निर्माण झाली, इतकी चीड की कधी खीर पाहिली की मला भीतीच वाटायची. म्हणून जेव्हा माझ्या घरी खीर बनवत तेव्हा मी आईला म्हणायचो की, 'मला हे गोड खायला आवडत नाही, तेव्हा मला दुसरे काय देशील? मग आई म्हणायची, 'बेटा, ही बाजरीची भाकरी आहे. आणि भाकरीबरोबर तूप-गूळ खाशील तर देते.' त्यावर मी म्हणत असे की, 'नाही, मला तूप-गूळ नको.' मग मला मध दिल्यावरच मी खात असे, पण खिरीला तर मी शिवतच नसे. मग आईने मला समजावले की, 'मुला, सासरी जाशील तेव्हा ते लोक म्हणतील