________________
गुरु-शिष्य
तर मुक्ती आहे. प्रत्येक जीवात भगवंत विराजमान आहेत, म्हणून त्या सर्वांपासून आम्ही काही संपादन करू तरच मुक्ती आहे.
तुम्हाला गुरूच्या बाबतीत समजले ना? प्रश्नकर्ता : हो. समजले.
दादाश्री : तुम्हाला येणारे अनुभव हे सुद्धा तुमचे गुरू आहेत. जेवढा अनुभव घेतला तो तुम्हाला उपदेश देईल आणि जर अनुभव उपदेशाचे कारण बनत नसेल, तर तो अनुभवच नाही. म्हणजे हे सर्व गुरूच आहेत.
अरे, एक मनुष्य लंगडत होता आणि दुसरा मनुष्य त्याची मस्करी करून त्याला हसला. नंतर थोड्यावेळाने तो (दुसरा मनुष्य) मला भेटला. त्याने मला सांगितले की आज तर मी एका माणसाची मस्करी करून हसलो. तेव्हा मी सावध झालो की अरे, तू आत्मा बघतोस की दुसरे काही बघतोस? मला हे ज्ञान झाले आणि मी खरोखर सावध झालो.
अर्थात प्रत्येक वस्तू उपदेश देत असते. प्रत्येक अनुभव नेहमी उपदेश देऊनच जातो. कधीतरी आरामात बसलेलो असू? आणि तेव्हा जर कोणी आपला खिसा कापला तर तो उपदेश आपल्याकडे शिल्लकच राहतो.
या कुत्र्याकडूनही काही जाणता आले तर जाणून घेतले पाहिजे, म्हणजे या कुत्र्यांना सुद्धा गुरू म्हणतात. हा कुत्रा दीड तासापासून येथे बसलेला असेल, पण जर त्याला भरपूर खायला घातले तरी तो जितके खाता येईल तेवढेच खातो आणि बाकीचे सर्व तसेच सोडून निघून जातो. तो काही सोबत घेऊन जात नाही की, 'चला, मी इतके घेऊन जातो.' म्हणजे कुत्र्यापासून पण आपल्याला शिकवण मिळते. अर्थात अशी प्रत्येक वस्तू की ज्यापासून आपल्याला शिकवण मिळते त्या सर्वांना आपण गुरू मानावे. कुत्र्यास काही गुरू व्हायचे नाही. परंतु त्याला जर आपण गुरू मानले तर त्याचा उपदेश आपल्यात उतरेल. हीच खरी पद्धत आहे!
ठेच लागते त्यास सुद्धा गुरू म्हणता येईल. गुरूशिवाय व्यक्ती पुढे