________________
क्लेश रहित जीवन
[१] जीवन जगण्याची कला
अशा आयुष्याला काय अर्थ? या आयुष्याचा हेतू काय असेल, हे तुम्हाला समजते का? काही तरी हेतू असेलच ना? आधी बालपण मग म्हातारपण आणि नंतर तिरडी निघते. जेव्हा तिरडी निघते तेव्हा दिलेले नाव परत घेतले जाते, येथे जन्माला आले की लगेच नाव दिले जाते ते व्यवहार चालविण्यासाठी! जसे नाटकातील नटाला भर्तुहरी नाव दिले जाते ना? नाटक संपले की नाव पण संपले. याचप्रकारे व्यवहार चालविण्यासाठी नाव देतात आणि त्या नावावर बंगला, गाडी, पैसे ठेवतात आणि जेव्हा अंत्ययात्रा निघते तेव्हा मात्र हे सगळे जप्त केले जाते. लोक आयुष्य जगतात आणि मग एक दिवस मरतात, अर्थात या सगळ्या अवस्था आहेत. आता या जीवनाचा हेतू मौज-मजा करणे असेल की मग परोपकार करण्यासाठी असेल? किंवा मग लग्न करून संसार थाटणे हा हेतू असेल? लग्न तर अनिवार्य असते. एखाद्यासाठी लग्न अनिवार्य नसेल तर लग्न होत नाही. पण सर्व सामान्यपणे लग्न तर होतातच ना?! नाव कमावणे हा आयुष्याचा हेतू आहे का? पूर्वीच्या काळी सीता, अनुसूया अशा सती होऊन गेल्या. त्यांचे खूप नाव झाले! पण तरीही नाव तर इथल्या इथेच राहणार आहे. मग सोबत काय घेऊन जायचे? तर तुम्ही केलेला गुंता!