________________
गुरु-शिष्य
स्टेशन दाखवले असते आणि म्हणाला असता की, 'हे स्टेशन आहे. तू आता या गाडीमध्ये बस.' सर्व काही दाखवून काम पूर्ण केले असते. हे तर तो सुद्धा भरकटलेला आणि आपण सुद्धा भरकटलेलो, म्हणून सतत भटकतच राहतो. तेव्हा आता खरा माहितगार शोधून काढा, तर तो स्टेशन दाखवेल. नाही तर अंदाजाने काहीही सांगून तुम्हाला भटकवतच ठेवेल. एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला घेऊन जाईल, तर तो कुठे घेऊन जाईल? आणि खरा माहितगार तर लगेच मार्ग दाखवेल. तो उधार-उसनवारवाला नसतो, तो तर रोखच असतो. अर्थात माहितगार भेटलाच नाही.तेव्हा आता माहितगार शोधा.
प्रश्नकर्ता : परंतु माहितगार, उपरी (वरिष्ठ, अधिकारी) असतो की नाही?
दादाश्री : माहितगार वरिष्ठ तर असतो, पण कुठपर्यंत? आपल्याला मूळ स्थानापर्यंत नेऊन पोहचवतो तोपर्यंत.
अर्थात शिरी उपरी तर पाहिजेच, मार्ग दाखविणारा पाहिजे, मार्गदर्शक पाहिजे, गाईड नेहमीच पाहिजे. सगळीकडेच गाईड तर हवाच. गाईडशिवाय कुठलेही काम होणार नाही. आपण इथून दिल्लीला जाऊ आणि गाईडला शोधू, मग त्याला काय म्हणतात? तर गुरू! त्याला गुरूच म्हणायचे. आपण पैसे देतो म्हणून तो गाईड बनतो. गुरू म्हणजेच जे आपल्याला मार्ग दाखवितात, गाईडसारखे.
प्रश्नकर्ता : म्हणजे मार्गदर्शकाची गरज तर पडतेच!
दादाश्री : हो. मार्गदर्शन करतात त्यांना गुरू म्हटले जाते. मग तो मार्ग दाखविणारा कोणीही असो, तो गुरू म्हटला जातो.
सर्व श्रेणी गुरू अवलंबित प्रश्नकर्ता : गुरूने मार्ग दाखवला, मग त्या मार्गावर चालायचे. त्यानंतर गुरूची गरज आहे की मग गुरूस सोडून द्यावे?
दादाश्री : नाही, गुरूची गरज तर शेवटपर्यंत आहे.