________________
गुरु-शिष्य
प्रश्नकर्ता : हो, बरोबर आहे.
दादाश्री : म्हणजे जाणकाराची आवश्यकता आहे. रस्ता दाखवणारे असे म्हणत नाहीत की तुम्ही आम्हाला रस्ता विचारा! आपल्याला गरज आहे म्हणून आपण विचारतो ना? कोणाच्या गरजेपोटी विचारतो?
प्रश्नकर्ता : आपल्या गरजेपोटी.
दादाश्री : नाही तर विचारल्याशिवायच चालत राहा ना, विचारायचे नाही आणि तसेच चालत राहायचे, असा अनुभव करून तर बघा! तो अनुभवच तुम्हाला शिकवेल की गुरू करण्याची आवश्यकता आहे, मला शिकवावे लागणार नाही.
म्हणजे मार्ग आहे पण मार्ग दाखविणारा नाही ना! दाखविणारा असेल तरच काम होईल!
गुरू म्हणजे, कोणी दाखविणारा माहितगार, हवा की नको? जो गुरू आहे त्याचे आम्ही फॉलोअर्स (अनुयायी) म्हटले जातो. गुरू स्वतः पुढे चालत जातात आणि आम्हाला पुढचा रस्ता दाखवित जातात, त्यांना माहितगार म्हटले जाते.
एक माणूस सुरत स्टेशनवर जाण्यासाठी या बाजूस वळला. इथून या रस्त्याने चालला आणि तो रोड आला पण नंतर लगेच या दिशेच्या ऐवजी त्या दिशेने चालू लागला, मग तो तिथे सुरत शोधत बसला तर त्याला सुरत सापडेल का? कितीही शोधत राहिला तरी सापडणार नाही. रात्र संपली, दिवस उजाडला तरी सुद्धा सापडणार नाही! अशी आहे ही सर्व गुंतागुंत.
चुकलेल्यास मार्गदर्शकाची साथ प्रश्नकर्ता : कोणताही गुरू खरा मार्ग दाखवित नाही.
दादाश्री : पण त्या गुरूलाच मार्ग माहीत नसेल मग काय होणार! माहितगारच कोणी भेटला नाही. माहितगार भेटला असता तर ही अडचण आलीच नसती. माहितगार भेटला असता तर त्याने आम्हाला नक्कीच