________________
१२२
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ
१. सहज वैराग्य आचार्यश्रींच्या प्रथमच्या क्षुल्लक दीक्षेच्या दुसऱ्या दिवशी (सन १९१४ साली) त्यावेळच्या शिरल्याप्रमाणे गावातील प्रमुख मानकऱ्याकडे गुरुशिष्यांचा आहार झाला. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे गुरुदक्षिणा म्हणून मानकऱ्यांनी प्रत्येकापुढे सव्वा रुपया ठेवला. गुरूने आपले नवे शिष्य क्षुल्लक शांतिसागरांना ते पैसे घेण्यास सांगितले. तेव्हा श्री शांतिसागर म्हणाले, जे नको होते म्हणून घर सोडले तेच दीक्षा घेऊनही घ्यायचे तर मग घर सोडण्याचे प्रयोजनच काय होते ? घरी पुष्कळ पैसा होता. मला तो सव्वा रुपया घ्यायचा नाही.
दीक्षागुरूची ही पद्धती त्यांच्या ज्ञानवैराग्य-संपन्न मनाला रुचण्या-पचण्यासारखी नव्हती. म्हणून श्री शांतिसागर महाराजांनी दीक्षेच्या तिसऱ्याच दिवसी आपला विहार स्वतंत्र रीतीने चालू केला. सारांश शान्तिसागर महाराज 'ज्ञानवैरागी' होते, विवेकसंपन्न होते. त्यांचे वैराग्य खरेखुरे होते. त्यांनी गतानुगतिकाचे अनुसरण केले नाही. कारण जो ज्ञानवैरागी आहे तो कसल्याही मोहाला बळी पडत नाही. कोणाची भीड मुलाहिजा ठेवीत नाही.
२. आचार्यश्रींची अबोल प्रज्ञा व्यवहारात 'न बोलता शहाणा' म्हणतात तशी आचार्य महाराजांची अबोल वृत्ती होती. याचा अर्थ महाराज बोलत नसत हा नव्हे. 'काय बोलावे या पेक्षा काय बोलू नये हे ज्याला कळते, तोच खरा वक्ता होय' ही महाराजांची अंतरंग वृत्ती होती. वरवर दिसायला जरी महाराज बोलके दिसत नसले तरीही त्यांना सर्व जनतेने स्वयंस्फूर्तीने सन १९२४ साली समडोळी मुक्कामी आचार्यपद आणि गजपंथ येथे चारित्र-चक्रवर्ती पद बहाल केले. तेथून आचार्य महाराज संघासह कुंभोज (बाहुबलीक्षेत्र) येथे आले. त्यावेळी संघामध्ये रोज शास्त्र वगैरे वाचण्याचे काम बहुभाग ऐल्लक चन्द्रसागर (नांदगाव, जि. नाशिक) ह्यांच्याकडे असे. आचार्यश्री त्यावेळी सहसा श्रोत्याची भूमिका ठेवीत असत. हे पाहून कुंभोजचे पाटील सर्व जनतेपुढे निर्भीडपणे म्हणत असत की 'आचार्यपद तेवढे शान्तिसागर महाराजांना आणि शहाणपण-ज्ञान सगळे चन्द्रसागरांना ! वस्तुतः आचार्यपद हे दगडासारखे बसून राहाणाऱ्या शान्तिसागरांना मुळीच द्यायला नको होते. चन्द्रसागरांनाच द्यायला हवे होते.' पाटलांचे हे आवडते मत त्यावेळी काहींना (वरवर पहाणाऱ्यांना) सयुक्तिक देखील वाटू लागले; परंतु त्याच वेळी कुंभोजच्या पाठशाळेचा एक प्रश्न निघाला. तेव्हा त्या संबंधीचा न्यायनिवाडा करण्याची सर्वांनी आचार्यश्रींना प्रार्थना केली. त्यांनी ती मान्य करून संबंधित व्यक्तीला बोलावून आणा अशी आज्ञा केली. तेव्हा नेहमीच्या सवयीला अनुसरून मध्येच चन्द्रसागर म्हणाले, ' महाराज ! ती व्यक्ती हेकेखोर आहे. जर आपली आज्ञा मानली नाही तर आपला अपमान होईल.' हे ऐकून आचार्य महाराज म्हणाले,
___'अरे बाबा ! जेथे मान आहे तेथे अपमानाचा प्रश्न उत्पन्न होईल. जेथे मानच नाही तेथे अपमानाची भीती कसली ? आपल्या मानापमानाचा विकल्प गौण करून श्रेयोमार्गाचा
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org