________________
स्मृति-मंजूषा
१६३ पाहिजे होता. येथे येऊन असे काय विशेष साधले वगैरे.' रात्री नदीच्या उत्तरेला काठ तरी वादळ झाले, विजा कडाडल्या आणि भयंकर पाऊस झाला. परिणामवश नदीला अभूतपूर्व महापूर आला व तेथील देऊळ, घरे, झाडे यांचा मागमूसही शिल्लक राहिला नाही. ही गोष्ट उजाडताच दुसरे दिवशी सकाळी ह्या लोकांना कोणीतरी येऊन सांगितली. पण त्यावर विश्वास न बसून काही मंडळी स्वतः जातीने तेथे जाऊन ते सर्व दृश्य पाहून आली. 'चक्षुर्वै सत्यं.' ती हकिगत ऐकून संघातील सर्वांनी एक दीर्घ श्वास सोडता सोडता आप-आपल्या कपाळाला हात लावला. किती तरी वेळ सुन्न होऊन ते स्वतःला दोष देऊ लागले. निंदा निर्भत्सना पूर्वक तुच्छ लेखू लागले. जर महाराजांनी ह्या लोकांच्या आग्रहादाखल राहुरीलाच त्या रात्री मुक्काम केला असता तर ? आचार्य, त्यागीवर्ग, संघपती आदि सोबतची श्रावक मंडळी ह्याचे नामनिशाण शिल्लक राहिले नसते. ह्या कल्पनेनेच सर्वांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. पश्चात्तापाने ते दिङमूढ झाले. हां हां म्हणता ही घटना सर्वांना ठाऊक झाली आणि महाराजांच्या धोरणीपणाबद्दल, निमित्तज्ञानाबद्दल अधिकच प्रगाढ श्रद्धा-भक्ति निर्माण झाली.
आश्चर्य हे होते की जेव्हा महाराज राहुरीस त्या नदीच्या पात्राजवळ उभे राहिले तेव्हा त्या पात्रात पाणी नव्हते, की आकाशात ढग नव्हता. असे असूनही केवळ दोनचार तासाने भर उन्हाळ्यात असा वादळी पूर येऊ शकेल हे कोणत्याही दृश्य चिन्हाशिवाय महाराजांना समजले कसे ? ह्याचे उत्तर कधीही कोणाला देता आले नाही. पण श्रावकांचे औत्सुक्य त्यांना स्वस्थ बसू देईना. काही दिवसांनंतर त्यांचा मुक्काम सोलापूरला असल्यावेळी तेथे हा प्रश्न विचारण्यात आला. महाराज सर्व काही समजले. एखादी अलौकिक शक्ती आपणास चिकटविण्याच्या प्रयत्नात ही मंडळी आहेत हे हेरून ते म्हणाले, 'सहज वाटले एवढेच'. महाराजांचा लौकिकपणापासून अलिप्त राहण्याचा हा प्रयत्न पाहून मंडळी अधिकच प्रभावित झाली.
पण एवढे मात्र खरे की, विशुद्धतेमुळे म्हणा किंवा तपश्चर्येमुळे म्हणा निर्णय घेण्याची त्यांची शक्ती अलौकिक होती. हा निमित्तज्ञानाचाच एक प्रकार आहे असे समजावयाला प्रत्यवाय नसावा.
प्रत्यक्ष दर्शनाने जे घडले ते हजारो प्रवचनांनी झाले नसते श्री. सवाईसंगई मोतीलालसावजी गुलाबसावजी, नागपूर (महाराष्ट्र)
१. प्रथम दर्शन मला आचार्यश्रींचे प्रथम दर्शन सन १९२५ मध्ये श्रवण बेळगोळ (म्हैसूर प्रदेश ) येथे झाले. त्यावेळी श्री गोमटेश्वराच्या महामस्तकाभिषेकाचा प्रसंग होता. व्यवस्थापन सर सेठ श्री हुकुमचंदजी इंदौरवाले व श्री वर्धमानय्या त्यांचेकडे होते. पूज्य महाराज, ७ मुनि, ४ ऐल्लक व ४ क्षुल्लक अशा संघासहित आले होते. नित्याप्रमाणे अभिषेकाचा विधि मैसूरच्या महाराजाकडून संपन्न होत असे. महाराज अजैन आहेत, त्यांना नग्न पुरुषाचे दर्शन निषिद्ध आहे. सबब महाराजांनी विंध्यगिरीवर जाऊ नये अशी विनंती प्रमुख श्रावकांनी
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org