________________
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ
संस्थान विचयात त्रिलोक स्वरूपाचा विस्तृत विचार आहे. चार गतींचे वर्णन. देवगतीचे वैभव विस्तृत चितारले आहे. व ह्याच संस्थान विचयात पिंडस्थ, पदस्थ, रूपरस्थ व रूपातीत ह्या चार प्रकारच्या ध्यानाचा अंतर्भाव केला आहे. आज उपलब्ध ग्रंथांत ह्या चार प्रकारच्या ध्यानाचा उल्लेख फक्त ह्याच ग्रंथात प्रथम सापडतो. म्हणून जैन योगसाधनेत ही एक नवी देन म्हणायला काही हरकत नाही.
२१०
पिंडस्थ ध्यानात पाच धारणांचे वर्णन आहे. पार्थिवी, आग्नेयी, श्वसना, वारुणी, तत्त्वरूपवती ह्या त्या धारणा होत.
पिंडस्थ धारणेत पार्थिवी धारणात प्रथम तिर्यकलोकसदृश निःशब्द कल्लोलरहित व बर्फसदृश क्षीरसमुद्राचे चिंतन, नंतर त्यात दीप्तिमान सहस्रदल कमळाचे चिंतवन, त्यानंतर कमळाचे मध्यभागी दशदिशा व्यापणाऱ्या पीतवर्ण कर्णिकेचे ध्यान, त्या कर्णिकेत श्वेतवर्ण सिंहासन व त्यात सुखशान्तस्वरूप, क्षोभरहित आत्म्याचे चिंतन आहे.
त्यानंतर आपल्या नभोमंडलात सोळा पाकळ्यांच्या कमळाचे व त्या कमळाच्या कर्णिकेत हूँ ह्या मंत्राची स्थापना व चिंतवन व त्या सोळा पानांवर अ, आ, ते अः पर्यंत सोळा अक्षरांचे ध्यान, त्यानंतर धूम, स्फुल्लिंग, ज्वाला त्यांच्यामुळे जळणाऱ्या हृदयस्थ कमळाचे चिंतवन. हृदयस्थ कमळ अधोमुख व आठ पाकळ्यांचे आहे. त्या आठ पाकळ्यांवर आठ कर्म स्थिर आहेत. व अशा कमळाला हूँ ह्या महामंत्रापासून उठणाऱ्या ज्वाला जाळतात. तेव्हा अष्टकर्म जळतात. ते कमल जळल्यानंतर अग्नीचे चितवन करावे व ह्या अग्नीच्या ज्वाला समूहाने जळणाऱ्या वडवानलाप्रमाणे ध्यान करावे. अग्नी बीजाक्षरव्याप्त, अन्ति सह चिन्हाने युक्त व वर वायुमंडलाने उत्पन्न धूमरहित असे चिंतवन करावे. ह्याप्रमाणे हे बाहेरचे अग्निमंडल अंतरंगाच्या मंत्राग्नीला दग्ध करते, त्यानंतर नाभिस्थ कमळाला जाळून दाह्य पदार्थाच्या अभावामुळे शांत होते.
त्यानंतर श्वसना धारणेत आकाशात पूर्ण होऊन संचार करणाऱ्या, वेगवान व महाबलवान वायुमंडलाचे चिंतन करावे. तो वारा जगात पसरून पृथ्वीतलात प्रवेश करून त्या दग्ध शरीरादिकाच्या भस्माला उडवून देतो व त्यानंतर तो शांत होतो.
वारुणी धारणा, गर्जना, विजा, इंद्रधनुष्यादि चमत्कारयुक्त मेघव्याप्त आकाशाचे ध्यान, त्यानंतर जलबिंदु धारा, त्यानंतर अर्धचन्द्राकार आकाशातला वाहून नेणाऱ्या वरुण मंडलाचे ध्यान व ह्या दिव्य ध्यानाने भस्मप्रक्षालन करतो असे चितवन करावे.
व त्यानंतर तत्त्वरूपवती धारणेत सप्तधातुरहित निर्मल सर्वत्र समान आत्म्याचे ध्यान करावे. त्यानंतर अतिशय युक्त सिंहासनावर आरूढ, कल्याणिक महिमायुक्त व पूज्य अशा आत्म्याचे चितवन व त्यानंतर अष्टकर्मरहित अतिनिर्मळ आत्म्याचे चिंतन करावे. पिंडस्थ ध्यानामुळे विद्या मंडळ, मंत्र, यन्त्र, इन्द्रजाल क्रूर क्रियादिकांचा उपद्रव होत नाही.
वास्तविक ज्ञानानन्दरूप आत्माच ध्येय आहे. पण ह्या पाच धारणादिका कल्पना करून कां ध्यान सांगितले हा प्रश्न आचार्यांनीच उभा करून उत्तर दिले की शरीर पृथ्व्यादिक धातुमय आहे. व पुद्गल कर्म
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org