________________
आचार्य शुभचंद्रकृत ज्ञानार्णव
२११
द्वारा उपन्न आहे. त्याचा आत्म्याशी सम्बन्ध आहे. त्यामुळे आत्मा द्रव्य भाव कलंकाने मलीन आहे. त्यामुळे अनेक विकल्प उत्पन्न होतात. त्यामुळे परिणाम निश्चल होत नाही. त्या चित्ताला स्वाधीन चिंतनाने वश करायला पाहिजे. आलंबनाशिवाय चित्तस्थैर्य नाही म्हणून पाच धारणांची कल्पना केल्या गेली. ह्याप्रमाणे प्रत्येक विक्षेपजन्य वस्तूवर मनाला अवरुद्ध करून क्रमाने उत्तम तत्त्वावर अवरुद्ध करण्याच्या अभ्यासाने ध्यानाची दृढ ध्यानसाधना होते. बाकीच्या सांप्रदायाने ह्या धारणा मानल्यात पण त्यामुळे काही लौकिक चमत्कारसिद्धी होते. पण मोक्षसाधक ध्यान यथार्थ आत्मतत्त्वनिरूपणाशिवाय होत नाही. गाभ्याशिवाय चोथा त्याप्रमाणे ते ध्यान आहे.
पदस्थ ध्यान -- पवित्र मंत्राच्या अक्षरस्वरूप पदांचा अवलंबन करून चिंतवन करतात. ते पदस्थ ध्यान होय. ह्यात वर्णमातृका ( स्वर व्यंजन ) ध्यान, प्रथम स्वरावली, नंतर अनुक्रमे पंचवीस व्यंजन, नंतर आठ वर्ण, नंतर हूँ बीजाक्षर तत्वरूप असणारे मंत्रराज, हे मंत्रराज अक्षर विविध लोकांनी विविध रूपात मानले आहे. पण हे अक्षर म्हणजे साक्षात जिनेन्द्र भगवान मंत्रमूर्तीला धारण करून विराजमान आहेत. प्रथम अर्ह अक्षराचे सर्व अवयवासहित ध्यान, नंतर अवयवरहित, नंतर वर्णमात्र चितवन करावे. त्यानंतर बिंदुरहित, कलारहित, रेफरहित, अक्षररहित, उच्चार करण्याला योग्य न होईल अशा क्रमाने चिंतन करावे. नंतर अनाहत देवस्मरण. ह्या ध्यानामुळे सर्व सिद्धी प्राप्त होतात. त्यानंतर प्रणवमंत्रा चे ( ओंकार ) ध्यान. पंचनमस्कार मंत्र, षोडशाक्षरी महाविद्या, ( अर्हत्सिद्धाचार्योपाध्याय सर्वसाधुभ्यो नमः ) अरहंत, सिद्ध, व पंचाक्षरमयी विद्या ( हाँ ह्रीं हूँ ह्रीं ह: अ सि आउ सा न मः ) मंगल उत्तम व सरण ह्या तीनही पदसमूहाचे स्मरण, त्रयोदशाक्षर विद्या ( अर्हतसिद्धसयोगकेवली स्वाहा ) हीं श्रीं नमः ' णमो सिद्धाणं ( अक्षर पंक्तीने विराजमान मंत्र ), अष्टाक्षरी मंत्र ( णमो अरहंताणं ) मायावर्ण ह्रीं सिद्धविद्या (इवीं) सात अक्षरी मंत्र, सर्वज्ञमुखविद्या, इत्यादी मंत्रविद्येचा उल्लेख विधी व फल सविस्तर सांगितले आहे.
क्रूरजंतू उपसर्ग व्यंतरादिक उपशमाकरता असणाऱ्या ध्यानाचे विशेष वर्णन आहे. त्यात एक मंत्र पद, पापभक्षिणी विद्या, सिद्धचक्र मंत्र, सर्वकल्याणबीज मंत्र सांगितला आहे. ग्रंथकारांनी वीतरागी योगी वीतरागीपणाने वीतराग समस्त पदार्थ समूह ध्येयाचे ध्यान करतो असे सांगितले. वरील सर्व मंत्राचा सूक्ष्मार्थ पाहिला तर कोणत्याही मंत्रात वीतरागता ध्येय आहे. हा सर्वांत सामान्य भाव आहे. पण त्यामुळे लौकिक सिद्धी व पारमार्थिक साध्य प्राप्त होते ह्यात संशय नाही. या ध्यानाने विशुद्धी, एकाग्रता, स्थैर्य वाढते. लौकिक योजना करता मान करण्याचा मोक्षमार्गात निषेध आहे.
रूपस्थ ध्यान-या ध्यानात अरहंत भगवानच ध्येय आहेत. व त्या अनुषंगाने सर्वज्ञांचा निश्चय करून निर्दोष सर्वज्ञ अरहंत जिनदेवांचे ध्यान करायला सांगितले आहे.
रुपातीत ध्यान - ह्या ध्यानाच्या वर्णनापूर्वी असमीचीन ध्यानाचा स्वप्नात देखील विचार करायला नको. म्हणूनच रूपस्थ ध्यानात स्थिरचित्त असणाऱ्याने अमूर्त इन्द्रिय अगोचर अशा परमात्म्याच्या ध्यानाला प्रारंभ करावा. ' चित्तमेवमनाकूलं ध्यानं ' अनाकूल चित्तच ध्यान आहे. प्रथम परमात्म्याच्या गुणसमूहाचे पृथक् पृथक् चितवन करावे. नंतर गुणसमुदाय रूप चिंतवन करावे. गुणगुणीच्या अभिन्नभावाने स्मरण व नंतर
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org