________________
१६८
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ
6
म्हणाले, प्रमाण एक लाखाचे असू द्या. नर करणी करे तो नर का नारायण हो जाय । ' आम्ही म्हणालो,
f महाराज ! हातून दान व धर्म खूप घडावा असे वाटते. जास्त परिग्रह कशाला ?' महाराज मंदस्मित करून म्हणाले ' बाबारे दानाचे भाव फार चांगले आहेत. ते केव्हाही फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाहीत. पण वेळ येताच गाफील राहून मोहात पडू नका.' पुढे महाराजांचे बोल खरे ठरले. महाराजांच्या अंतिम इच्छेप्रमाणे सदर क्षेत्रावर १८ फूट उंची भ. बाहुबलीची मूर्ति बसविण्याचा सुयोग पू. गुरुदेव १०८ समंतभद्र महाराजांचे उपदेशानी प्राप्त झाला व क्षेत्रकमेटीच्या सहकार्याने पूर्ण झाला.
श्री. स्व. ध. शेठ रामचंध धनजी दावडा यांचे सोबत शिखरजीची यात्रा पायी करण्याचा योग आला. महाराजांचा धर्मोपदेश लाभला. २-६-५२ च्या शुभदिवशी प. पू. महाराजांचे संघासह नातेपुते येथे आमचे बागेत पदार्पण झाले व त्याच दिवशी आचार्यश्री व पू. नेमीसागर महाराजांच्या आहारदानाचे पुण्य लाभले. महाराजांचा पावन समागम व उपदेशाने जीवनात धर्माचा प्रकाशकिरण मिळाला असे वाटते. त्यांच्या पावनस्मृतीला विनम्र अभिवादन.
समीचीन व्यवहारज्ञता
श्री. मोतीचंद हिराचंद गांधी, 'अज्ञात' उस्मानाबाद
सन १९२८ किंवा १९२९ चा काळ असावा. ब्रम्हचर्याश्रम व सिद्धक्षेत्र कार्यालय दोन्ही संस्था दानशूर परांडेकर घराण्याच्या कुशल कार्यकर्तृत्वामुळे सुयोग्य रीतीने चालू होत्या. तेव्हा निझामचे अंतर्गत भूम संस्थानचे हद्दीत हे क्षेत्र होते. परंतु पुढे दुर्दैवाने दोन्ही संस्थांच्या कारभारात शिथिलता आली. ब्रह्मचर्याश्रमाच्या दारांना कुलुपे ठोकली गेली. खुद्द क्षेत्राच्या व्यवहारातही चोखपणा व शिस्त राहू शकली नाही.
पण
इतक्यात प. पू. आचार्य शांतिसागर महाराजांचा विहार क्षेत्रावर होणार ही बातमी सर्वत्र पसरली.. दर्शनाच्या अभिलाषेने अपार भीड जमली. लोकांनी जागा मिळेल तेथे मोकळ्या मैदानात बस्तान ठोकले. कुलुपे मात्र बंदच. मोगलाई असल्यामुळे भीतीने कुलुपे तोडण्यास कोणीच धजले नाही. प्रस्तुत लेखकही आपल्या तंबूसह त्यावेळी तेथे हजर होता. अन्यायाच्या प्रतिकारार्थ पाऊल उचलावे लागले. कार्यकारिणीशी झगडावे लागले. हातोडीच्या झटक्याने सर्व इमारती मोकळ्या झाल्या. इतरांनीही तसेच केले. विरोध झाला नाही. पण वार्ता सर्वत्र पसरली. पिताजीने प्रामुख्याने ही वार्ता पू. आचार्य श्रींचे कानी घातली. महाराजांनी त्यात लक्ष घालून तडजोडीचा प्रयत्न केला. नवीन मॅनेजिंग बॉडी नेमण्याचे ठरले. जुन्या कार्यकर्त्यांनी त्यात सहभागी होऊन स्वतः यादी केली. सर्व ठराव लिहिला गेला. त्यावर जुन्या सभासदांनीही सह्या देण्याचे कबूल केले. त्यावेळी महाराजांनी समयज्ञता व व्यवहारकुशलता या द्वारे उत्कृष्ट भूमिका पार पाडून क्षेत्र वाचविले व समाजात एकता स्थापित केली. त्यांना कृतज्ञतापूर्वक नम्र अभिवादन.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org