________________
स्मृति-मंजूषा
१६७ फौजदारांनी नग्न साधूच्या विहाराला हरकत घेतली. तरीही महाराजांच्या निर्णय ठाम होता. परंतु महाराजांच्या तपश्चर्येच्या प्रभावाने संस्थानाधिपती बाळासाहेब औंधकर याच्या दक्षतेमुळे विहार निराबाध झाला.
___ नह्यमंत्रं विनिश्चयं निश्चित च न मंत्रणम् । ही व्यवहारनीती उपादेयच आहे.
महाराजांचा प्रभावी चरणस्पर्श व नर्म विनोद
मोतीलाल शिवराज दोशी, फलटण प. पू. आचार्य शांतिसागर महाराजांच्या आशीर्वाद छात्राखाली बराच काळ राहण्याचा योग आला. त्यांच्या स्मृतीने आजही मन उल्लसित होते. पूज्य महाराजांचा चातुर्मास किंवा वास्तव्याने चतुर्थ काळाचे शास्त्रात जे वर्णन आहे त्याचीच प्रचीती यावी. महाराजांचे फलटणला येणे ठरले तेव्हा नदी, नाले व विहिरी, सर्व काही आटलेले होते. सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. परंतु दुसरे दिवशी अकस्मात् वर उगमाकडे कोठे पाऊस पडल्याने नदीला पूर आला व चिंता मिटली. कोणाचे पाय भाग्याचे म्हणतात ना ! तशांतलाच हा प्रकार म्हणावयाचा ! तसेच महाराज प्रसंगविशेषी नर्म व प्रसन्न विनोदही करीत. एकदा मी फलटणला विहार असतांना महाराजांना दवना चढविला. महाराज विनोदाने म्हणाले " दवना चढविला होय. आम्हास महादेवाचा भगत आज भेटला म्हणावयाचा." पुढे सिद्धक्षेत्र कुंथलगिरीला सल्लेखना घेतली असताना आमचा तेथे चौका व जाणेयेणे होते. महाराज म्हणाले, 'सल्लेखनेचे वेळी दवना जवळ असावा ' नंतर १-२ दिवसांनी दवना घेऊन कुंथलगिरीला आलो तो महाराजांनी चारही प्रकारच्या आहाराचा त्याग घेतला होता. श्री. भरमाप्पांनी सांगितल्यावर “ तुम्ही आणलेला दवना तुम्हीच महाराजांचे जवळ ठेवा." " महाराज फलटणचे गौतमचंद भाईंनी दवना आणला आहे." महाराजांपुढे दवना ठेऊन दर्शन केले. महाराजांनी दवनाकडे नजर टाकली. तेव्हा महाराज हसून म्हणाले, “ भगत आला होय !" व त्यांनी आशीर्वाद दिला. असा होता महाराजांचा प्रसन्न निरागस विनोदी स्वभाव !
व्रते देताना प्रकट झालेला विवेक
__ श्री. तलकचंद नेमचंद गांधी, नातेपुते _ वि. सं. २००० मध्ये आ. पू. शांतिसागरांचा चातुर्मास सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे असताना त्यांच्या 'पावन सान्निध्यात आठ महिने राहण्याचे भाग्य लाभले. त्यांच्या उपदेशाने प्रभावित होऊन १-२ प्रतिमा घेण्याचे भाव झाले. त्यात परिग्रह परिमाण किती असावे याचा उहापोह सुरू होता. मी म्हणालो, 'आ. पिताजी नेमचंद मियाचंद गांधी यांची ५०००० ची मर्यादा होती. तीच कायम असावी.' पण महाराज
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org