________________
१७२
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ प्रश्न-महाराज ! आपला आचार्यश्रींबरोबर अगदी सुरुवातीस संबंध कसा व केव्हा आला ? उत्तर-या प्रश्नांना वास्तविक काय महत्त्व आहे ? प्रश्न-सहज कुतूहल म्हणून आम्ही जाणू इच्छितो.
उत्तर-कोण्णूर येथील गुंफेत आचार्य महाराज राहात असतांना ब्र. जीवराज गौतमचंद, तात्या आदि बरोबर पहिले दर्शन झाले. त्यानंतर बहुतेक प्रतिवर्ष कोठे ना कोठे दर्शन घडतच असे. त्यांचेसंबंधी मनात अलोट भक्ती होती. ते कोठेही असले तरी, वर्षातून एकदा दर्शनास जाणे होई. मग ते दिल्ली, अजमेर, ललितपूर कोठेही असोत. मुनिदीक्षेपर्यंत हा क्रम अखंड सुरू होता.
प्रश्न -यावेळी प्रामुख्याने काय बोलणे होई ?
उत्तर-ते काही आठवणे शक्य नाही. कार्यवश अधिक राहणे होत नसे व आचार्य महाराजही ते जाणून असत. केवळ कुशल वार्तालाप व काही उपदेश व्हायचा. त्यांचा महाराजावर फार मोठा अनुग्रह होता. तो शब्दांनी कसा व कुठवर सांगता येणार ? वैयक्तिक जीवन व संस्थेच्या दृष्टीनेही त्यांचे अगणित उपकार झालेले आहेत. ते विसरता येणे शक्य नाही. पण आता हे सोडून दुसरे महत्त्वाचे काही विचारा. या गौण गोष्टीत कालापव्यय नको.
प्रश्न-परमपूज्य आचार्य महाराजांचा सल्लेखनासमाप्तीनंतर कोठे जन्म झाला असेल ? त्यांना 'निर्वाण' प्राप्त झाला असे लोक म्हणतात ते कितपत बरोबर आहे ?
उत्तर-'निर्वाण' हा शब्द जैनधर्मानुसार 'मोक्ष' किंवा 'मुक्ती' याचा पर्यायवाची समजला जातो. त्या दृष्टीने प. पू. आचार्यश्रींचा ‘निर्वाण' झाला हे म्हणणे बरोबर होत नाही. कारण या काळात भरतक्षेत्रातून मोक्ष अगर मुक्ती नाही. अणुव्रत किंवा महाव्रतसंपन्न व्यक्ती या काळात नियमाने स्वर्गात देवपर्याय प्राप्त करते. 'अणुवय-महन्वयाइं न लहइ देवाउंग मोत्तुं।' देवायुशिवाय त्यांना दुसरी गतिआयु प्राप्त होत नाही असे शास्त्रवचनच आहे. यावरून प. पू. आचार्यश्रींचा जन्म कोठे झाला असेल हा प्रश्न शिल्लक रहात नाही. सामान्य लोक अज्ञानाने शब्दाचा नीट अर्थ लक्षात न घेता बोलतात त्यास इलाज नाही. तत्त्वदृष्टया ते चूक आहे.
प्रश्न-आचार्य महाराजांना जी लोकोत्तर महनीयता व लोकपूज्यता प्राप्त झाली त्याचे प्रधान कारण काय असावे ?
उत्तर-'महापुरुषांचे मोठेपण आणि लोकोत्तरता त्यांच्या आत्मोत्थानामध्ये असते व आत्मोत्थान हे धर्मश्रद्वान आणि धर्मपालन यामध्ये असते.' आचार्य महाराजांची धर्मश्रद्धा अत्यंत अकाट्य होती. धर्ममार्ग व धर्माचारावर असा प्रगाढ विश्वास ठेवणारी माणसे हडकन सापडावयाची नाही या अगाध श्रद्धेमुळे त्यांचे आत्मबल उत्तरोत्तर वाढत गेले आणि या आत्मबलावरच संपूर्ण जीवनपर्यंत आचार्य महाराजांनी श्रेष्ठ संयमाची आणि चारित्राची आराधना केली. दुर्लभ मागवजन्माची सार्थकता त्यामध्येच आहे. 'संयम बिन घडिय म इक्कहि जाउ' 'संयमाशिवाय माझी एकही घडी (घटिका) न जावो' हे
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org