________________
१७१
स्मृति-मंजूषा १७ वर्षांपूर्वी व आता प. पू. समंतभद्र गुरुदेवांशी झालेल्या चर्चेतून
आचार्यश्री संबंधी
पं. धन्यकुमार गंगासा भोरे, कारंजा प्रश्न-प. पू. आचार्यश्री शांतिसागर महाराजांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष चालू आहे. ही शताब्दी आम्ही तरुणांनी कशी साजरी करावी ? यासंबंधी आपले काय अभिमत आहे ?
उत्तर- या बाबतीत महाराजांना न विचारणेच चांगले ! साधुजनांची 'जन्मजयंती' वा 'जन्मशताब्दी' या गोष्टी महाराजांच्या तत्त्वात कधीच बसत नाहीत. लोक करतात त्यास इलाज नाही. पण महाराजांना त्यात कधीच रस वाटत नाही. सामान्य लौकिक जनासारखे साधूंचे जीवन नसते. त्याची
ळी वेगळी. म्हणन अन्य लोक असे जन्मोत्सव साजरे करतात अतएव आपणही करणे हे केवळ त्यांचे अंधानुकरण होय.
प्रश्न—पण या निमित्ताने त्यांच्या श्रेष्ठ जीवनाची स्मृती उजळली जाते, नवीनांना उत्साह व प्रेरणा मिळते हा अशा जन्मोत्सवांचा मोठा फायदा नाही काय ?
उत्तर—आहे ! पण तो त्या दिवसापुरता, काही कालापुरता ! पुढे काय ? पुनः विस्मृती ! परत आठवण वर्षानंतरच ! आणि तीही पूर्वीप्रमाणे तात्पुरतीच ! अशा गतानुगतिकेतून स्थायी लाभ कोणता ?
प्रश्न-मग स्थायी लाभासाठी काय केले पाहिजे.
उत्तर-श्रेष्ठ पुरुषांनी आपल्या जीवनात जे कार्य केले ते आपणही आपल्या जीवनात विशेष गाजावाजा न करता सदैव करीत राहिले पाहिजे. आचार्य महाराजांचे जीवन या दृष्टीने अभ्यासून त्यांच्या आदर्शाचा पाठ रोज अल्पांशाने का होईना गिरवला तरच त्या स्मृतीचा काही खरा उपयोग होईल.
प्रश्न-आचार्यश्रींच्या जीवनातून या शताब्दीनिमित्त नवीन पिढीला आपण कोणता खास संदेश द्याल ?
प्रश्न-वस्तुतः त्यांचे समग्र त्यागमय जीवन हाच सर्वात मोठा संदेश आहे. तो सदैव आपणास प्रेरणा देणारा ठरला पाहिजे. 'वीतरागता व विज्ञानता' हीच कोणाच्याही जीवनात मंगलता, पवित्रता व श्रेष्ठता आणणारी असते.
मंगलमय मंगलकरण वीतराग विज्ञान ।
नमों ताहि जाते भये, अरिहंतादि महान् ।। ज्यायोगे साक्षात् अरिहंत पद प्राप्त होते ती ही वीतरागता व विज्ञानताच होय. आचार्य महाराजांनी याचीच आयुष्यभर आराधना केली व जातानाही आपणा सर्वांसाठी यासंबंधीचाच महान संदेश देऊन गेले. त्याहून दुसरा कोणता संदेश महाराज आपणास सांगणार ? आचार्यश्रींप्रमाणे तोच आपण आपल्या हृदयात कोरून ठेवावा. त्याचेच वारंवार स्मरण व चिंतन करावे म्हणजे आपलेही जीवन मंगलमय बनल्याशिवाय राहणार नाही.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org