________________
स्मृति- मंजूषा
१७५
बौद्ध धर्माचा प्रसार का झाला ? काही लोक जरूर असे म्हणतील, राजाश्रय होता म्हणून झाला; परंतु हे खरे कारण नाही. बुद्धाचे हजारो शिष्य व शिष्यिणी देशाच्या निरनिराळ्या भागामध्ये फिरले, अनेक प्रकारचे कष्ट व नाना यातना त्यांनी सहन केल्या, लोकोपकाराची हजारो कामे केली. आपण 'भगवान् त्यांनी सहन केलेल्या कष्टांची व केलेल्या त्यागाची कमालच म्हटली झाला त्याला खरे कारण त्यागीजनांचा त्याग आहे हे आपणाला
बुद्धासाठी ' हे पुस्तक वाचले ना ? पाहिजे. बुद्ध धर्माचा जो व्यापक प्रसार 'दृष्टिआड करता येण्यासारखे नाही.
आद्य शंकराचार्यांनी तरी वैदिकधर्माच्या प्रसारासाठी काय केले ? तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी ठिकठिकाणी मठांची स्थापना व त्यागी निर्माण केले आणि त्याकरवी हिंदु धर्माची - वैदिक धर्माची प्रतिष्ठा • वाढविली.
शिवकालामध्ये समर्थ श्री रामदास स्वामींनी तरी काय केले ? महाराष्ट्र धर्म जागृत करण्यासाठी शेकडों ठिकाणी मठांची स्थापना व ' बाराबाराशे ब्रह्मचारी त्यागी लोकांना निर्माण केले.' हे किती मोठे कार्य केले ? तो काळही किती प्रतिकूल होता ! ' सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे ' हे लक्षात घेऊन त्यांनी जे जे केले त्याला इतिहास साक्षी आहेच.
त्यानंतर इंग्लिश लोकांनी जे केले ते आपल्या डोळ्यापुढे आहेच. मिशनरी लोकांचा सेवेचा एक दृष्टिकोण आहे. ते एक स्पिरिट ( Spirit ) आहे. Chastity, Poverty and Brotherhood पावित्र्य, अकिंचनता आणि बंधुता' या व्रताचा त्यांनी अगिकार केलेला असतो. ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यासाठी ते जगाच्या पाठीवर कुठे गेले नाहीत ? येथे आले, आफ्रिकेच्या जंगलावनात गेले, सिलोन, सयाम, चीन, जपान, तिबेट, मलाया सर्व ठिकाणी गेले. त्याठिकाणी जनतेच्या कल्याणाची कामे त्यांनी केली. दवाखाने उघडले, शाळा उघडल्या, महारोग्यांसाठी इस्पितळे उघडली. जे काम करण्यास सहसा कोणी पुढे येत नाही ती सर्व परोपकाराची कामे त्यांनी केली हे खरे ना ? त्यांचे ते मिशनरी स्पिरिट जसे लक्षात घेण्यासारखे आहे तसेच त्यांची त्यागबुद्धीही आपणांस दृष्टिआड करता येण्यासारखी नाही.
6
ही सर्व उदाहरणे आपणापुढे ठेवण्यामध्ये कुणालाही श्रेष्ठ-कनिष्ठ लेखण्याचा उद्देश नाही. धर्मप्रभावनेचा मुद्दा जसा महत्त्वाचा आहे तसेच त्याचा मूलगामी विचार आपणांसारख्यांनी तरी करणे जरुरीचे नाही काय ? हे सर्व कोणी करायचे ? सामान्य जनता प्रवाह - पतित होणारी असते. थोर पुरुषांच्या नावाने गाव-नगर वसविणे, घर-मंदिर बांधणे, ग्रंथ-पुस्तक छापविणे, स्तंभ- मूर्ति- प्रतिमापुतळे उभे करणे ही सारी स्मारकांची लौकिक पद्धत प्रचलित आहेच. यामध्ये लोकोत्तरता ती कसली ?
प्रश्न -- महाराज ! आपण म्हणता ते खरे. पण ते कितीतरी कठीण आहे. आम्ही जे पाहतो, समजतो व करतो ते सोपे आहे, शक्य आहे.
उत्तर
- होय, कठीण तर खरेच ! प्रश्न मुळातला स्मारकाचा होता. अलौकिक पुरुषाचे, त्यातल्या त्यात आचार्य महाराजांसारख्या थोर ऋषिरत्नाचे, महर्षीचे योग्य स्मारक कोणते असावे हे आपण विचारले होते.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org