________________
स्मृति-मंजूषा आचार्य श्री ' पारसमणी '
परिसाचा लोखंडाला स्पर्श झाला की त्या लोखंडाचे सोन्यात रूपान्तर होते. तद्वत् आचार्य श्री देखील पारसमणी होते. सन १९२३ साली आचार्य श्रींचा चातुर्मास कोण्णूर (ता. गोकाक ) येथे होता. • त्यावेळी नांदगांव ( जि. नाशिक ) चे ४/५ यात्रेकरू श्रवणबेळगोळ - गोमटेश्वर स्वामींच्या दर्शना करिता निघाले होते. जाता जाता त्यांना सांगली मुक्कामी समजले की, कोण्णूर येथे एक महान् तपस्वी दिगम्बर -मुनि आहेत. यात्रेकरूंमध्ये दोघे श्रावक मोठे चौकस बुद्धीचे होते, तसेच व्यासंगी होते, कर्मठ होते. त्यांना . ही बातमी ऐकून आश्चर्य वाटले.
पंचम काळात महान तपस्वी दिगम्बर मुनि असणे असंभव आहे अशी त्यांची प्रामाणिक समजूत • होती. परीक्षा घेण्यासाठी श्रीमान् शेठ हिरालालजी आणि श्रीमान् शेठ खुशालचंदजी दोघेही आचार्य - महाराजांसमोर येऊन बसल्यावर पुढील संवाद झाला. शेठ खुशालचंदांनी महाराजांना विचारले, 'आम्ही दोघे आपणाकडे कशासाठी आलो हे आपणास समजले काय ?' तेव्हा महाराज म्हणाले 'नाही.'
' आपणाला अवधिज्ञान आहे काय ' ? शेठ 'नाही' महाराज. 'आपण उन्हाळ्यात डोंगरावर 'पावसाळ्यात वृक्षाखाली, आणि हिवाळ्यात नदीकाठी बसून तपश्चर्या करीत असता काय ?' शेठ.
' नाही - महाराज.
6
'आपण पक्षोपवास, मासोपवास वगैरे करता काय ? ' - शेठ.
'नाही'
- महाराज.
6
मग आम्ही आपणास मुनी कसे म्हणावे ? ' - शेठ.
१२५
'मुळीच म्हणू नये ' - - महाराज.
6
'मग हे तुम्ही काय चालवले आहे ? – शेठ.
'मुनिपदाचा अभ्यास आरंभला आहे. आम्हाला कोणी मुनि म्हटले नाही तरी चालेल. • त्याबद्दल आम्हाला काहीच सुखदुःख नाही.' महाराज.
हा सगळा संवाद सर्व भक्तमंडळी ऐकत होती. त्यांना महाराजांचा हा उपमर्द वाटला. त्या पैकी काही तर अस्तन्या सावरून पुढे आले 'आतापर्यंत जे काही बोललात त्यावरून तुम्हाला काही शिष्टाचार कळत नाही असे दिसते. आता बऱ्या बोलाने तोंड बंद करा आणि आल्या वाटेने चालते व्हा. नाहीपेक्षा धक्के मारून आम्ही तुम्हाला येथून घालवून देऊ. चला उठा पाहू येथून !' – एक बोलला.
Jain Education International
महाराज शान्त करीत म्हणाले, 'जरा शान्त व्हा. हमरीतुमरीवर येण्याचे प्रयोजन नाही. शंका विचारणारांना दहाही दिशा मोकळ्या असतात.' पांचदहा मिनटे गेल्यावर महाराज त्या दोघांकडे वळून म्हणाले की, 'आम्ही तुम्हास काही विचारले तर चालेल काय ?' होकार मिळताच महाराजांनी विचारले -की- 'हे समोर झाड कसले आहे ?' समोर बोट दाखवून - महाराज.
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org