________________
१३७
स्मृति-मंजूषा
आठवण पहिली ४७-४८ वर्षांपूर्वीची ही आठवण आहे. कोल्हापूरच्या दिगंबर जैन समाजाने पर्युषण पर्वासाठी मला बोलावले होते म्हणून मी गेलो होतो. धर्मवीर भूपालप्पा जिरगे यांनी जैन बोर्डिंगाचे आवारात एक सुंदर जिनमंदिर बांधविले आहे. त्या मंदिरात ते धर्मवीर मला सकाळी आठ वाजता घेऊन जात असत. जिनवंदना झाल्यानंतर तेथे एकीभाव स्तोत्रावर प्रवचन करा म्हणून मला ते सांगत असत. त्यांना ते स्तोत्र फार आवडे मलाही ते स्तोत्र फार आवडत असे. दररोज त्यातील दोन श्लोकांचे विवेचन अर्धा पाऊण तास होत असे. ते झाल्यावर तेथून एका जिनमंदिरात सागारधर्मामृतातील दान, पूजा, स्वाध्याय, वैयावृत्य आदिक विषयांवर घंटा सवाघंटापर्यंत प्रवचन होत असे त्यावळी पं. कल्लाप्पा भरमाप्पा निटवे जैन-बोधकाचे त्यावेळचे संपादक हेही प्रवचन श्रवण करण्यासाठी येत असत.
त्यांनी सर्व श्रोत्यांना त्यावळी अशी सूचना केली होती की प्रवचन चालू असता मध्ये कोणास काही शंका आली असता तिचे निरसन करण्यास त्यांनी प्रवचनकारास विनंती करू नये. कारण त्यामुळे विषयांतर होण्याचा संभव असतो. प्रवचन संपल्यावर आपली शंका विचारावी.
त्यांच्या सूचनेप्रमाणे प्रवचनाचे वेळी कोणाकडून शंका विचारली जात नसे. प्रवचन अकरा सव्वाअकरा पर्यंत झाल्यावर श्रीमान् वयोवृद्ध रामचंद्र नाना पिराळे यांच्या घरी जेवण होत असे. पिराळे यांच्या माडीवर छोटेसे पण सुंदर जिनमंदिर आहे व पुढे ५०-६० माणसे बसण्याइतका प्रशस्त मंडप आहे. तेथे दोनपासून पाच वाजेपर्यंत तत्त्वार्थसूत्राचा एक अध्याय व दशलक्षण धर्मावर प्रवचन होत असे.
दोन प्रहरी पूर्वीचे श्रीलक्ष्मीसेन भट्टारकही तेथे येत असत. ते संस्कृत भाषेतून प्रश्न विचारीत असत, त्यामुळे त्यांचे उत्तर संस्कृत भाषेत मी देत असे. श्रीमान् भूपालप्पा जिरगे यांनी तुम्ही दोघे संस्कृत भाषण करता व आम्हाला ते समजत नाही व आमचा वेळ व्यर्थ जातो, आपण या वेळा सोडून इतर वेळी बोलत जा असे म्हटले व भट्टारक महोदयांनीही त्यांचे म्हणणे मान्य केले.
दशलक्षण पर्व सानंद समाप्त झाल्यावर श्रीमान् भूपालप्या जिरगे यांनी आचार्य शान्तिसागर महाराजांचे दर्शनास आपण काही श्रावक मिळून जाऊ असे म्हटले व ते मी मोठया हर्षाने मान्य केले. आचार्य महाराजांचा चातुर्मास त्यावेळी ऐनापुरात होता असे मला आठवते.
कोल्हापुराहून भाद्रपद वद्य द्वितीयेच्या दिवशी आम्ही ऐनापुराच्या जिनमंदिरात सकाळी सुमारे आठ वाजता पोहोचलो. जिनदर्शन झाल्यावर शान्त व प्रसन्न मुद्रेच्या आचार्यांचे दर्शन घेतले, मनाला आनंद वाटला. त्यांना वंदन करून बसल्यावर मधुर शब्दांनी मला त्यांनी तुझेच नाव जिनदास आहे काय असे विचारले. मी होय असे म्हणालो.
तेव्हा महाराज म्हणाले, अरे तू माझ्यावर मोठे उपकार केले आहेस. हे त्यांचे शब्द ऐकल्यावर मी आश्चर्याने थक्क होऊन म्हणालो, महाराज, मी आपणास प्रथमच पाहात आहे व आपण सर्व जगावर उपकार करीत आहात. मी पामर आपल्यावर कसा उपकार करू शकेन ?
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org