________________
स्मृति- मंजूषा ९. विवेकपूर्ण सावधानता
आचार्य महाराजांचे भोवतालचे वातावरण त्यागाने एकप्रकारे भरलेलेच असावयाचे. एक मनुष्य श्रींच्या काहीसा परिचयातला उभा राहिला व तो, 'महाराज ! मलाही परस्त्रीचा त्याग मन, वचन, कायेने व कृत-कारित अनुमोदनेने द्या' असे आग्रह करकरून मागू लागला. आचार्यांच्या लक्षात व्रतयाचने-मधील देखादेखीचा भाग लक्षात आला. श्रींनी परोपरीने त्यामधील कठिनता स्पष्ट केली. अखेरीस 'तुझी फारच इच्छा आहे तर बाबारे ! वचन आणि कायेने तुला त्याग देतो. मनाने होणे मोठमोठ्या त्यागींनाही साधत नाही' असा खुलासा केला. ही बाब परिपक्व विचार-शीलतेशिवाय लक्षात कशी येणार ?
१०. परिणत प्रज्ञाविवेक
परमपूज्य गुरुदेव श्री १०८ समंतभद्रजींना पूर्वावस्थेमध्ये ( सप्तम प्रतिमाधारी असताना ) कित्येक वेळा त्यांनी मुनी व्हावे असा आग्रह सुरूच होता. अधूनमधून दर्शनाचा योग आला असता ही प्रेरणा व्हायचीच. ब्यावरला 'श्रीं'चा चातुर्मास होता. ब्र. देवचंदजी तेथे पोहोचले. त्यावेळीही निदान त्यांनी क्षुल्लकपद ( ११ वी प्रतिमा ) तरी घ्यावे असा आग्रह पडला. देवचंजींची आतून इच्छा होतीच. तथापि त्यांनी श्रींना सरळच विचारले, ' संस्थेची कामे करण्यास प्रत्यवाय नसला तर तयारी आहे. '
१४५
ब्र. जींची वृत्तिप्रवृत्ति 'श्री' परिपूर्ण ओळखून होते. त्यांनी हा प्रश्न उपस्थित पंडितवर्गापुढे ठेवला. थोडीशी परंपरा लक्षात घेऊन शास्त्राधाराच्या भानगडीमध्ये न पडता पंडितजनांनी आपला एकतर्फी निर्णय पुढे ठेवला. - ' महाराज ! यांना एक तर दीक्षा घेता येईल किंवा संस्था पाहता येईल. दोन्ही नाही. '
' दोन्ही करण्यामध्ये शास्त्रविरोध असू नये असे मन सांगते ' एवढेच देवचंदजी बोलत होते.
चार पाच दिवस प्रश्न धसास लावूनही अनुकूल निर्णय बाहेर येत नाही हे पाहून ब्र. जी अखेरीस परत निघाले. प्रवेशद्वाराजवळ वाहन उभे करून अखेरीचे श्रींचे दर्शन घ्यावे म्हणून दर्शनास गेल्याबरोबर श्री म्हणाले - ' ब्रह्मचारीजी आपणास क्षुल्लकपद स्वीकारता येईल व संस्थाही पाहता येईल. शास्त्रामध्ये संघातल्या काही मुनींकडे संघातील शिक्षणाची व इतरही व्यवस्थेची जबाबदारी असल्याची अनेक विधाने आहेत. आपण तर केवळ क्षुल्लक पदच स्वीकारता आहात. तेव्हा आपणास पूर्ण परवानगी आहे' असे म्हणून आपला पूर्ण परिणत प्रज्ञाविवेक उपयोगास आणून समाजावर महा उपकार केले असेच म्हणावे लागेल. अर्थात् हा प्रीव्ही कौन्सिलच्या निर्णयाप्रमाणे अखेरचा निर्णय ठरला. ब्र. देवचंदजींनी त्याच ठिकाणी दुसरे दिवशी क्षुल्लकपदाचा सानंद स्वीकार केला व श्रींनी त्यांचे नाव स्वयं प्रेरणेने 'समंतभद्र' ठेवले.
११. पतिता नो रत्नवृष्टिः
आचार्यश्रीचे मुख शेडबाळच्या मुक्कामानंतर म्हसवडकडे म्हणजे उत्तरेकडेच वळले होते. नान्द्रे येथे मुक्काम होता. यावेळी बाहुबली येथे होणाऱ्या रथयात्रेसंबंधी श्रींना कल्पना होतीच. बाहुबलीकरांनी
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org