________________
स्मृति-मंजूषा आयाबायांचा मेळावा टाळणे किती अगत्याचे असते हे त्यांना अनुभवपूर्वक सांगावयाचे होते, ते त्यांनी तास दीड तास खुल्या दिलाने सांगितले. उघड्यावर न सांगता येण्याजोगी सात्यकी मुनींची कथाही सांगितली. मुनींनी जर दक्षता घेण्याची जरुरी आहे तर गृहस्थास केव्हाही खरेच. तो दिवस व तो महत्त्वपूर्ण उपदेश विसरणे शक्य नाही.
आचार्य श्रींची परिणत प्रज्ञा
डॉ. हेमचंद्र जैन, कारंजा
१. उपवास
प्रश्न-आजकाल उपवास फार केले जातात हे कितपत योग्य आहे ?
आचार्यश्री-धर्मध्यानाची साधना हा उपवासाचा मूळ हेतू आहे. तो निर्दोष, निराकुलरीतीने साधला जात आहे ह्याची मनोमन खात्री असेपर्यंतच उपवास करावेत. विकल्प म्हणजे आर्तध्यान-रौद्रध्यान उत्पन्न होत आहेत असे वाटताच ते संपविले पाहिजेत. २. दयापात्र कोण ?
प्रश्न-महाराज, अधिक दयापात्र कोण ?
आचार्यश्री-दीन आणि दुःखी जीव तर दयापात्र आहेतच, पण आम्हाला त्यांचेपेक्षाही धनी, वैभवसंपन्न व सुखी लोकांना पाहून हे लोक अधिक दयापात्र वाटतात.
प्रश्न-याचे कारण काय ?
आचार्यश्री-हे लोक पूर्वपुण्याने आज सुखी असल्यामुळे विषयभोगात उन्मत्तपणे मग्न आहेत. पुढचा त्यांना विचार नाही. जोपर्यंत जीव संयम आणि त्याग ह्यासंबंधी विचार करीत नाही तोपर्यंत त्याचे भविष्य उज्ज्वल ठरू शकत नाही.
काही लोक आमची अर्थात् त्यागी लोकांची सेवा, सुश्रूषा, भक्ती करण्यात खूप आनंद मानतात, वेळ देतात, मात्र संयम धारण करण्यास भितात. त्यांचीही आम्हास फार दया येते. ३. ज्योतिष
प्रश्न-योग्य काल, मंगल मुहूर्त, पुण्य वेला पहाणे आवश्यक आहे काय ?
आचार्यश्री-अगदी आवश्यक आहे. कोणालाही दीक्षा देताना स्थिर लग्न आणि शुभमुहूर्त पाहावा अशी शास्त्राज्ञा आहे. अयोग्य मुहूर्तावर दिलेली दीक्षा खंडित होते हे आम्ही अनुभवले आहे.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org