________________
स्मृति-मंजूषा
७. आचार्यश्रींची एकाग्रता प. पूज्य आचार्य महाराज सामायिकास बसले असताना जेथे बसले होते, तेथे काही तरी चिकट 'पदार्थ लागून त्या ठिकाणी बरेच मुंगळे लागले व त्यामुळे महाराजांना १ इंच खोल अशी जखम झाली. सामायिक झाल्यानंतर लोक पाहू लागले, त्यावेळी जखमेतून सारखे रक्त गळत होते. इतकी जखम होऊन रक्त गळू लागले. तरी त्यांच्या मनाची एकाग्रता ढळली नाही.
८. आचार्यश्रींची प्रायश्चित्त घेण्याची पद्धत आचार्य महाराजांचा आहार चालला असताना दुसरीकडे आहार तयार करून आणून आहार दिला. हे महाराजांना समजल्यावर त्याचे प्रायश्चित्त म्हणून आठ दिवसपर्यंत फक्त दुधाचा आहार घेऊन ते भर उन्हाळ्याचे दिवसात आठ दिवसपर्यंत डोंगरावर जाऊन तपश्चर्या करीत बसले.
फलटण येथे असताना स. २००२ च्या मार्गशीर्ष मासी पूज्य आचार्य महाराजांचा बारामतीमार्गे वडवानीकडे प्रयाण करण्याची विचारधारा चालू होती. अशा वेळी आचार्य महाराज बाणगंगेच्या वाळवंटात बसले असता आमचे पूज्य पिताजी ती. वीरचंद कोदरजी गांधींनी विनंती केली की, महाराज आम्ही श्रीक्षेत्र दहिगांव येथे प्राचीन २००० वर्षांपूर्वीच्या श्री. १००८ पार्श्वनाथ जिन प्रतिमेची स्थापना केली आहे, त्या मूर्तीचे आपण दर्शन घ्यावे. आमच्या पूज्य पिताजींचे म्हणणे ऐकून घेऊन आचार्य महाराज श्रीक्षेत्र दहिगांवकडे कोणासही माहित नसताना एकदम निघाले व दहिगांव येथे दोन महिने मुक्काम करून नंतर त्यांनी वडवानीकडे प्रयाण केले.
१०. साधकाची साधना अशी असते ___ बाहुबली येथे चातुर्मासाकरिता आचार्य महाराज संघासह असताना त्यांचे जवळ पं. धन्नालालजी वगैरे विद्वान् होते व महाराजांची श्रीसम्मेद शिखरजीकडे विहार करण्याची चर्चा सुरू होती. तेव्हा पं. धन्नालालजी म्हणाले की, आपणास निझाम हद्दीतून जाताना फार त्रास होईल. तेव्हा अगोदर मंत्रसिद्धी करून नंतर विहार करावा. तेव्हा महाराज पं. धन्नालालजींना म्हणाले की, आपण विद्वान् असून आम्हाला असा मिथ्या उपदेश कसा करता ? यात्रेत त्रास झाला व मरण आले तर तेथेच आमची समाधी होईल. आम्ही जे महाव्रत स्वीकारले आहे ते भिण्याकरिता नाही. श्रीक्षेत्र कुंथलगिरी येथे आचार्यजींचे समाधिकाल अवधीत अगदी सुरुवातीपासून अंतकाळपर्यंत त्यांची सेवा वैय्यावृत्य करण्याचा पुण्यलाभ आम्हाला मिळाला. त्यामुळे आम्ही आमचा जन्म कृतार्थ समजतो.
आचार्य महाराजांकडून शंकानिरसन प. पू. श्री. १०८ शान्तिसागर महाराज यांनी सन १९२७ मध्ये आपल्या संघासह प्रथमतःच फलटण येथे येवून निवास केला होता. मुनींचा विहार प्रथमच असल्यामुळे भावुक लोकांची सारखी गर्दी दर्शनास चालू होती. त्यात अनेक लोकांच्या अनेक शंका निघून महाराजांना त्यांचे सतत शांततेने निरसन करावे
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org