________________
१४८
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ ही विद्या भगवंताच्या वाणीचाच एक भाग आहे. दीक्षा, यात्रा, प्रतिष्ठा ह्यासाठी तज्ज्ञांची संमती घेतली पाहिजे व त्यांचा सन्मान केला पाहिजे. ४. दुधाचे ग्राह्यत्व
प्रश्न-दूध पवित्र व ग्राह्य कसे ? (ते पशूच्या शरिरापासून बनते त्याअर्थी ?)
आचार्यश्री-गाईने खाल्लेले गवत शरीरात सप्तधातुरूप परिणमते. शरीरात दूध निर्माण करणारी संस्था-यंत्रणा ही स्वतंत्र आहे. त्याचा रक्त, मांस, वगैरेशी प्रत्यक्ष संपर्क येत नाही किंवा त्यात ते मिसळतही नाही.
प्रश्न-अधिक स्पष्ट व सोदाहरण सांगावे महाराज ! आचार्यश्री-माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. त्यातूनच तुमच्या प्रश्नाचे उत्तर बाहेर येईल. आ. प्रश्न-(परधर्मियांस ) गंगाजल पवित्र मानता की नाही तुम्ही ? 'मानतो.' गंगेत मगर, मासळी, बेडूक, वगैरे प्राणी वास्तव्य करतात का ?' 'करतात की.' त्यांचे मलमूत्र गंगेच्या पाण्यातच विसर्जन होते ना—तरी गंगाजल पवित्रच मानता ? 'मानतो.'
'तर मग त्यापेक्षा दुधाचे वास्तव्य, निर्मिती व पावित्र्य अधिक श्रेष्ठ आहे. शिवाय दुधाची उत्पत्ती ही वत्साच्या आवश्यकतेपेक्षा अधिक होत असल्याने त्याची उपासमार न करता मिळवता येऊ शकते. अतएव ते ग्राह्य समजावे. ५. भेदविज्ञान
प्रश्न-भेदबुद्धीने शारीरिक कष्ट का जाणवत नाहीत ?
आचार्यश्री-जसे चुलीत लाकूड जळते तेव्हा माणसाला वेदना होत नाहीत, तसेच शरीराला पीडा होत असता शरीरात एकत्व बुद्धी नसली तर आत्म्याला त्याबद्दलच्या वेदना जाणयू नयेत. जाणवल्या तर भेदबुद्धीत अपक्वता आहे असे समजावे ! थंडी, उष्णता दंशमशक वगैरे परीषह सहन करताना जर काही कष्ट जाणवलेच तर त्यामुळे भेदविज्ञानी दुःखी झालेला आढळणार नाही. केशलोचाचे वेळी ह्याचा प्रामुख्याने प्रत्यय येतो. ६. संसार-त्यागाचे महत्त्व
प्रश्न-शांती मिळवण्यासाठी संसार-त्याग अपरिहार्य का वाटला आपणाला ?
आचार्यश्री-परिग्रहाने मनात चंचलता, राग, द्वेष ह्यांचे थैमान चालूच राहाते. वाऱ्याचा वेगवान झोत चालू असताना दीपशाखा स्थिर रहाणे जसे असंभव व सागरही लाटारहित राहाणे असंभव त्याचप्रमाणे
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org