________________
स्मृति-मंजूषा पूर्ण दक्षता घ्यावयास नको काय ? अवश्य धेतली पाहिजे असे सुचविले. त्यांनीही मोठ्या अदबीने नमस्कार केला व 'जरूर दक्षता घेईन' अशी प्रतिज्ञा घेतली. एवढेच नाही तर त्याचवेळी आजीवन मद्य-मांस व शिकारीचा त्याग केला. महाराजश्रींनी अत्यंत शांततेने हे सर्व केले हे पाहून उपस्थित सर्वांनाच आश्चर्य वाटले.
४. महापुरुषांची परिणतप्रज्ञा आचार्यश्रींचे शालेय शिक्षण जरी थोडे झाले होते तथापि निरंतराचा श्रुताभ्यास, श्रवण व मननाने बुद्धी व भावनांना एक प्रकारची तीक्ष्णता आलेली होती. ललितपूर येथे श्रींचा चातुर्मास होता. पंडितजी देवकीनंदनजी योगायोगाने तेथे पोहोचले. शास्त्रानंतर चर्चा सुरू झाली. पंडितजींनी प्रश्न केला, ' महाराज ! कित्येक दिवसांपासून एक प्रश्न मनात सारखा घोळतो आहे. विचारू का ?' 'विचारा की!' म्हटल्यानंतर पंडितजींनी विचारले, ' महाराज ! मुनियों के मूलगुण २८ हैं वे तो ख्याल में रह सकते हैं; परंतु उत्तर गुण जिनकी संख्या शास्त्रों में ८४ लाख कही है उनका हिसाब प्रतिदिन कैसा बैठता होगा ? और उनका स्मरण भी कैसा होता होगा ? और जब कि स्मरण अशक्य है तो निरतिचार पालना कैसी संभव होगी ?'
पंडितजी !' महाराज उत्तरले, 'आपका प्रश्न अत्यंत गंभीर और महत्त्व का है। त्यागियोंके लिए परपदार्थ और परद्रव्यों के प्रति जैसी निष्पक्ष और निरिच्छ वृत्ति कही उसी प्रकार से उनके लिए यह भी एक विधान है कि वे आत्मध्यान में सदैव लीन रहे । 'अप्पा अप्पम्मि रओ इणमेव परं हवे झाणं।' यही परमध्यान है। यही सामायिक है। इस शास्त्रवचन के अनुसार जब साधु की आत्मा आत्मा में ही एकाग्र होती है, उस समय इन ८४ लाख उत्तर गुणों का हिसाब आपही आप स्वयं लग जाता है । स्वतन्त्र रूपस हिसाब रखने की या स्मरण करने की आवश्यकता नहीं रहती।'
मार्मिक प्रश्नाचे मार्मिक उत्तर ऐकून पंडितजींना परम संतोष झाला.
५. अपरिग्रहात शांती वहाड-मध्यप्रदेशातून 'श्रीं'चा विहार सुरू होता. पं. देवकीनंदजींची दारव्ह्यापासून नागपूरपर्यंत कितीतरी ठिकाणी सुंदर व्याख्याने झाली. व्याख्यानामध्ये अपरिग्रहव्रताचे यथार्थ स्वरूप पुढे ठेवताना पंडितजी एक सुंदर वाक्य बोलून गेले. व्यवहार भाषेमध्ये 'अहिंसा हे पाप म्हटले आहे व अध्यात्मभाषेमध्ये परिग्रह हे महापाप म्हटले आहे.' व्याख्यानवाचस्पतींची प्ररूपणा व भाष्य श्रींना मोठे मनोहर वाटले. त्यानंतर स्वयं श्रींचा उपदेशही झाला. त्यामधून 'परिग्रह हा पापरूप आहे याची कल्पनाच माणसाच्या मनाला सहसा शिवत नाही! याला कारण अज्ञान व मोह आहे' हे श्रींनी अनुभवपूर्वक सांगितले. अपरिग्रहाने पारमार्थिक शांती कशी मिळते व व्यवहारामध्येही अपरिग्रह व्रताने कसा सुख-लाभ होतो याचे स्पष्टीकरण आल्हादजनकच वाटले. गुणभद्राचार्यांनी आपल्या आत्मानुशासन ग्रंथात 'अन्यथा सुखिनामानः कथमासंस्तपस्विनः' असे म्हणून तपस्वी जनांना संस्कृत कोशग्रंथात 'सुखी' हे नाव
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org