________________
१३८
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ महाराजांनी आपल्या बोलण्याचे स्पष्टीकरण याप्रमाणे केले. जिनवंदना, स्वाध्याय, अष्टमी, चतुर्दशी वगैरे पर्वतिथी, सिद्धान्तवाचन वगैरे प्रसंगी कोणत्या भक्ति मुनींनी म्हणाव्यात याविषयीची माहिती फक्त आम्हाला आहे व त्या भक्ति संस्कृत व अर्धमागधी भाषेत आहेत. पण त्या दोन्ही भाषांचे ज्ञान आम्हाला मुळीच नसल्यामुळे त्या भक्त्यांच्या श्लोकांचा अर्थ आम्हाला समजत नव्हता; पण तू जेव्हा दशभक्तीचा अर्थ मराठी भाषेत लिहिलास व दानवीर श्री रावजी सकाराम दोशी यांनी ते शास्त्र छापविले तेव्हा ते आमच्या वाचण्यात येऊन प्रत्येक भक्तीचा खुलासा वाचन भक्ति का म्हणाव्यात व त्या मुनीच्या रत्नत्रयाला निर्मळ ठेवण्यात कसे सहाय करितात इत्यादि गोष्टी समजल्या. त्यामुळे तू आम्हावर उपकार केले असे मी म्हणालो असे महाराज म्हणाले.
त्याच वेळी श्री दानवीर रावसाहबेही महाराजाचे दर्शनास आले तेव्हा तर महाराज त्यांना पाहून म्हणाले, रावसाहेब यांच्याकडून अशीच कार्ये तुम्ही करून घेत जा असे म्हणून, तू जिनवाणीची सेवा करीत जा असा आशीर्वाद माझ्या मस्तकावर पिंछी ठेवून मला त्यांनी दिला.
महाराजांच्या प्रथम दर्शनी हा आत्महितकारक अत्यंत गोड प्रसंग घडला व मला मोठा आनंद वाटला.
दुसरी आठवण नंतर महाराजांचा विहार काही वर्षांनी बाहुबली क्षेत्रावरून दर्शनाकरिता सम्मेदशिखरजीचे यात्रेकडे झाला. अर्थात महाराज उत्तर हिंदुस्थानाकडे विहारार्थ निघाले. संघपति श्री. घासीलालजींनी महाराजांना तिकडे नेण्याचे ठरविले होते. श्रीमान् दानवीर रावसाहेबही संघपतीप्रमाणे आपल्या धर्ममूर्ती धर्मपत्नीसह गेले होते. महाराजांच्या आगमनाने सम्मेदशिखरजी येथे मोठी धर्मप्रभावना झाली. महासभेचे अधिवेशनही तेथे झाले. या अधिवेशनाचे अध्यक्षपदी बॅरीस्टर चंपतरायजी होते. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारण्याच्या पूर्वी महाराजाजवळ पंचाणुव्रते ग्रहण केली. नंतर अध्यक्षपद त्यांनी स्वीकारले होते. यानंतर ललितपूर वगैरे ठिकाणी महाराजांचे चातुर्मास झाले. यानंतर एक चातुर्मास महाराजांचा ब्यावर येथे झाला. त्यावेळी महाराजांच्या दर्शनास मला दानवीर रावसाहेबांनी नेले होते. महाराजांना मी वंदन केल्यानंतर महाराजांनी मला तू आता कोणत्या ग्रंथाचे लेखन करीत आहेस असा प्रश्न विचारला. मी सांगितले, महाराज मी आता मूलाराधना अर्थात भगवती आराधनेचा मराठी अनुवाद करीत आहे असे म्हणालो, तेव्हा महाराज मला म्हणाले, भगवती आराधनेचा स्वाध्याय मी केला आहे व मी माझे वडील जेव्हा आसन्न मरण झाले तेव्हा तो मी त्यांना सर्व वाचन दाखविला. त्याच्या स्वाध्यायाने आत्म्याला शान्तिलाभ होतो अशी माझी खात्री आहे. त्या ग्रन्थाचा तू अनुवाद करीत आहेस ही चांगली गोष्ट आहे. पण तो अनुवाद मराठी भाषेत न करिता हिन्दी भाषेत कर. मी म्हणालो, महाराज हिन्दी भाषेत अनुवाद करणे मला जमणार नाही. महाराज म्हणाले, हिन्दी भाषेत अनुवाद करण्याचा प्रयत्न कर व तो जुळेल व या ग्रंथाचा अभिप्राय स्पष्ट कर. याच्या संस्कृत टीका आहेत त्यांचा आधार घेऊन जर अनुवाद केलास तर त्या ग्रंथाचे महत्त्व विद्वान व स्वाध्याय करणाऱ्या लोकांना पटून त्याचा जैन समाजात प्रचार होईल.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org