________________
१३०
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ एखाद्याला ८।१० दिवसपर्यंत ती मिळू शकत नसे. ८।१० दिवसपर्यंत प्रतीक्षा करणारे तसेच बाजूस राहून आदले दिवशीच आलेल्यांना खोली मिळे. महाराजाना या गोष्टीची कल्पना नव्हती.
एके दिवशी एक गृहस्य त्रस्त होऊन व्याकुळतेने म्हणाले, महाराज, 'गेल्या आठ दिवसांपासून आम्ही खोलीसाठी वाट पहात आहोत. पण ती आम्हाला मिळत नाही. पण कालच बाहेर गावाहून आलेल्यांना ती मिळाली.'
हे ऐकून महाराजांना ह्या पद्धतीत उद्दिष्ट आहाराचा विकल्प जाणवला. दुसरे दिवशी त्या खोलीत आहार न घेण्याचा संकल्प करून महाराज आहाराला निघाले. पण अन्यत्र कोठेच चौका नसल्यामुळे गावात फेरी मारून महाराज उपवास धरून बसले. लोक सचिंत झाले. पण दुसरे दिवशी अन्यत्र अनेक चौक्यांपैकी एके ठिकाणी आहार घेतला गेला.
अशा रीतीने दक्षता घेऊन आचार्य महाराजांनी दोन गोष्टी साधल्या. (१) उद्दिष्ट आहार त्याग, (२) नकळत होणाऱ्या अन्यायावर उपाय !
गृहस्थजीवनातील घटना प.पू. १०८ श्री महाबल मुनीमहाराज
जगावेगळा दयाळूपणा बालपण, तारुण्य व गृहस्थी जीवनातही दया, परोपकार, कनवाळूपणा हा त्यांचा स्थायी भाव होता. तसाच संसारामध्ये गुंतून राहण्याचा भाव नसल्यामुळे विरक्ततेला पोषक भूमिका होती. त्यांना वडिलांनी शेतराखणीकरिता पाठविले होते. पक्ष्यांना शेताबाहेर सर्वच घालवितात. परंतु यांनी शेताबाहेर घालविणे तर दूरच, परंतु आपल्या शेतांतील झाडाच्या एका उंच फांदीत रुंद तोंडाचे मातीचे मोठे भांडे पाण्याने भरून शिंक्यासारखे लोंबकळत ठेवले होते. 'कशासाठी ? ' असे विचारल्यावर ते म्हणाले, 'हुरडा खाल्ल्यावर त्यांना पाणी पिण्यासाठी बाहेर जाण्याचे कष्ट पडू नयेत म्हणून.' प्राणिमात्राविषयी त्याना दयाबुद्धी होती. रखवाली तर ते झाडाखाली पंच णमोकार मंत्राचा जप करीत करीत करत.
परमार्थीला प्रपंच नकोच असतो हा व्यवहारातील गैर प्रकार पाहून त्यांचे वडील बंधूनी त्यांना दुकानावर बसविले. तेथेही ते गिहाईकांना माल देऊन त्यांचेकडे असतील तेवढे पैसे घेत व माल उधार देत. उधारीच्या वसूलीसाठी तगादा तर सोडाच पण मागणीही करणे त्यांना जड जाई.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org